हल्ली मुलांना वाढवणं हे अजिबातच सोपं काम राहिलेलं नाही. मुलांशी जुळवून घेणं आणि त्यातून त्यांना योग्य धडे नेत पुढे घेऊन जाणं हे पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. या दरम्यान बऱ्याचदा असंही होतं की पालकांकडून काही गोष्टी नकळतपणे घडून जातात आणि त्यामुळे मग मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये कायमचा दुरावा येऊ लागतो. मुलांची पालकांशी असलेली ॲटॅचमेंट हळूहळू कमी होऊ लागते आणि मग पालकांपेक्षा त्यांना त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा इतर लोकच जास्त जवळचे वाटू लागतात. मुलांच्या आणि तुमच्या नात्यामध्ये असा दुरावा नको असेल तर पालकांनी काही गोष्टी अगदी कटाक्षाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे...(common parenting mistakes that create emotional distance)
पालक आणि मुलांमध्ये दुरावा आणणाऱ्या गोष्टी...
१. पालक आपापल्या कामांमध्ये अडकलेले असतात हे अगदी खरं आहे. सध्या तर बऱ्याच मुलांचे दोन्ही पालक नोकरी करणारे असतात. त्यामुळे मग बऱ्याचदा अशी वेळ येते की मुलांना पालकांना काहीतरी सांगायचं असतं पण पालकांकडे मुलांचं ऐकून घेण्यासाठी वेळच नसतो.
घरातल्या भिंतीला टेकून उभे राहा आणि 'हा' व्यायाम करा - सुटलेलं पोट होईल सपाट
वारंवार असं होत गेलं तर आपलं आपल्या पालकांच्या लेखी काहीही महत्त्व नाही. त्यांना आपलं ऐकूनच घ्यायचं नाही, ही भावना मुलांच्या मनात बळावत जाते आणि ते दुखावले जातात. पालकांपासून दूर व्हायला लागतात.
२. पालक कायम दुसऱ्या मुलांचं कौतूक आपल्या मुलांना ऐकवत असतील किंवा कायम दुसऱ्या मुलांची उदाहरणं देऊन मुलांना टोमणे मारत असतील तर ही गोष्टही मुलांच्या आणि पालकांच्या नात्यात दुरावा आणू शकते.
आंबा खा आणि कोय 'या' पद्धतीने डोक्याला लावा, केस भराभर वाढतील- रेशमासारखे मऊ होतील
३. मुलं काही सांगत असतील तर ते ऐकून घेणं खूप गरजेचं आहे. मुलांचं सगळं बरोबरच असतं असं नाही. मुलांच्या काही काही गोष्टी पालकांसाठी खूप त्रासदायकही असू शकतात. पण अशावेळी मुलांवर चिडण्यापेक्षा त्यांना समजावून सांगणं जास्त योग्य. रागावर नियंत्रण ठेवा आणि मुलं करत असणारी गोष्ट कशी चुकीची आहे हे त्यांना समजावून सांगा. वारंवार मुलांवर चिडलात तर त्यांनाही तुमचा राग येतो आणि ते ही मग तुमच्यावर चिडून तुमच्यापासून दूर जातात.
