Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > आंबा खा आणि कोय 'या' पद्धतीने डोक्याला लावा, केस भराभर वाढतील- रेशमासारखे मऊ होतील 

आंबा खा आणि कोय 'या' पद्धतीने डोक्याला लावा, केस भराभर वाढतील- रेशमासारखे मऊ होतील 

How to Use Mango Seed For Hair Care?: आंब्याची कोय तुमच्या केसांच्या कित्येक तक्रारी संपवून टाकू शकते. त्यासाठी ती नेमकी कशा पद्धतीने वापरायची ते पाहुया...(how to prepare mango seed hair mask?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2026 16:41 IST2026-05-05T16:40:27+5:302026-05-05T16:41:11+5:30

How to Use Mango Seed For Hair Care?: आंब्याची कोय तुमच्या केसांच्या कित्येक तक्रारी संपवून टाकू शकते. त्यासाठी ती नेमकी कशा पद्धतीने वापरायची ते पाहुया...(how to prepare mango seed hair mask?)

use of mango seed for hair, how to use mango seed for hair care, how to prepare mango seed hair mask, benefits of applying mango seed hair mask  | आंबा खा आणि कोय 'या' पद्धतीने डोक्याला लावा, केस भराभर वाढतील- रेशमासारखे मऊ होतील 

आंबा खा आणि कोय 'या' पद्धतीने डोक्याला लावा, केस भराभर वाढतील- रेशमासारखे मऊ होतील 

Highlightsकेसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढही चांगली होते. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा. 

सध्या आंब्याचे दिवस आहेत. त्यामुळे घरोघरी आमरस होत आहे. त्यामुळे आंबे वारंवार आणणं होतंच.. आता सर्वसामान्यपणे दिसून येणारं एक चित्र म्हणजे आपण आंबा खातो आणि त्याच्या काेयी सालांसकट कचऱ्यात टाकून देतो. पण आंब्याची कोय ही खरंतर कचरा नाही. तिच्यामध्ये कित्येक औषधी गुणधर्म असून आपल्या केसांसाठी तर ती खूप उपयुक्त ठरणारी आहे. आंब्याची कोय जर एका खास पद्धतीने तुमच्या केसांना लावली तर केसांना कित्येक फायदे मिळू शकतात आणि केसांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात (how to prepare mango seed hair mask?). त्यासाठी कोयीचा वापर नेमका कसा करायचा ते पाहुया...(benefits of applying mango seed hair mask)

 

आंब्याच्या कोयीचा केसांसाठी कसा वापर करावा?

आंब्याची कोय केसांसाठी कशी उपयुक्त ठरू शकते, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी healthyshark.in या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये ते सांगतात की या कोयीचा उपयोग बाहेरच्या देशांमध्ये कित्येक हेअर प्रोडक्ट्समध्ये केला जातो. कारण त्यामुळे केसांना नॅचरल कंडिशनिंग मिळतं.

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

यासाठी सगळ्यात आधी कोय फोडून घ्या. तिच्या आतमध्ये जो गर असतो तो मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्या. यामध्ये १ ते २ चमचे दही आणि १ चमचा खोबरेल तेल घाला. तिन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करा.

 

त्यानंतर केसांच्या मुळापासून ते शेवटच्या टोकापर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. यानंतर साधारण अर्ध्या तासाने केस धुवून टाका.

घरातल्या भिंतीला टेकून उभे राहा आणि 'हा' व्यायाम करा - सुटलेलं पोट होईल सपाट

हा उपाय केसांसाठी एक नॅचरल कंडिशनर म्हणून काम करतो. यामुळे केस खूप मऊ आणि सिल्की होतात. तसेच डोक्यातला कोंडाही कमी होतो. केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढही चांगली होते. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा. 


 

Web Title : बालों के विकास और मुलायमपन के लिए आम की गुठली का हेयर मास्क इस्तेमाल करें।

Web Summary : आम की गुठली को फेंके नहीं! इसका उपयोग एक हेयर मास्क बनाने के लिए किया जा सकता है जो बालों के विकास को बढ़ावा देता है, बालों को मुलायम बनाता है और रूसी को कम करता है। गुठली के अंदरूनी गूदे को दही और नारियल के तेल के साथ मिलाएं, लगाएं और आधे घंटे बाद धो लें।

Web Title : Use mango seed hair mask for hair growth and softness.

Web Summary : Don't throw away mango seeds! They can be used to create a hair mask that promotes hair growth, softens hair, and reduces dandruff. Mix the seed's inner pulp with yogurt and coconut oil, apply, and rinse after half an hour for best results.