How To Stay Energetic: आठवडाभर काम केल्यावर सुट्टीच्या दिवसाची सगळेच आतुरतेने वाट बघत असतात. सुट्टीचा दिवस आराम करण्याचा, पेंडिंग कामे करण्याचा असतो. सामान्यपणे सुट्टीच्या दिवशी एनर्जेटिक वाटलं पाहिजे. पण अनेकांसोबत असं होत नाही. सुट्टी असूनही शरीरात एनर्जी राहत नाही. जी या दिवशी हवी असते. म्हणजे घरीच आहात, काही काम केलं नाही आणि जसजसा वेळ जातो तशी पूर्ण एनर्जी कुणीतरी शरीरातून काढून घेतली असं अनेकांना जाणवतं. असं झाल्यावर पहिल्यांदा तर सगळ्यांना हेच वाटतं की, झोप पूर्ण झाली नसेल किंवा कमजोरी असेल. पण मुळात कारण वेगळंच असतं. यामागे आपल्याच घरात लपून बसलेले काही 'Energy Drain Spots' असू शकतात. आता 'Energy Drain Spots'काय असतं? तेच आपण समजून घेणार आहोत.
आपली एनर्जी नष्ट करण्याचं काम आपल्या घरातील वातावरण, घरात ठेवलेल्या वस्तू आणि आपल्या छोट्या सवयी नकळत आपली मानसिक आणि शारीरिक एनर्जी संपवतात. या गोष्टींचा आपल्या मनावर खोलवर प्रभाव पडत असतो, त्यामुळे एनर्जी नसल्यासारखं जाणवतं. पण मुख्य कारणांकडे लक्ष न देता, याला कमजोरी किंवा झोप न होणं समजलं जातं. चला तर पाहुयात एनर्जी संपवणाऱ्या गोष्टी कोणत्या...
घरी राहूनही एनर्जी डाउन का होते?
घरातील पसारा
घर स्वच्छ जर नसेल तर ते दिसायलाही वाटत नाही आणि आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करतं. सोफ्यावर, बेडवर अस्ताव्यस्त पडलेले कपडे, किचनमधील ओट्यावर भांड्याचा डोंगर, खेळण्यांचा पसारा, बाथरूममधील कपडे या गोष्टी आपल्या मेंदूसाठी 'व्हिज्युअल नॉइस' ठरतात. जेव्हा आपले डोळे सुट्टीच्या दिवशी घरातील हा सगळा पसारा बघतात, तेव्हा ते मेंदूला पेंडिंग कामे वाटतात. त्यामुळे मेंदू बॅकग्राउंडमध्ये सतत प्रोसेसिंग करत असतो, ज्यामुळे आपण काही न करता मानसिक रूपाने थकता.
व्हेंटिलेशन
जर आपल्या घरांमध्ये पुरेशी हवा आणि नॅचरल प्रकाश येत असेल तर हेही थकव्याचं मुख्य कारण असू शकतं. सूर्यप्रकाश आपल्या शरीराला सांगत असतो की, जागण्याची आणि अॅक्टिव राहण्याची वेळ झाली आहे. अंधाऱ्या किंवा कमी प्रकाश असलेल्या घरात किंवा रूममध्ये शरीर मेलाटोनिन बनवू लागतं. ज्यामुळे दिवसभर सुस्ती आणि झोप आल्यासारखं वाटत राहतं.
जुने इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स
घरातील जुना फॅन जर काच-किच आवाज करत असेल, फ्रिजचा येणारा आवाज, टीव्ही बरोबर चालत नसेल तर याचाही वाईट प्रभाव पडतो. मेंदू या गोष्टींचा सतत सामना करत असतात. डोक्यात हे आवाज, या गोष्टी फिट झालेल्या असतात. ज्यामुळे हळूहळू चिडचिड आणि थकवा वाढतो.
काय उपाय?
सगळ्यात आधी तर घरातील अनावश्यक वस्तू बाहेर फेका. खिडक्या उघडून घरात हवा आणि प्रकाश येऊ द्या. घरात हलके रंग, वेगवेगळी झाडं लावा. सुगंधी अगरबत्ती लावा. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे घरात पसारा अजिबात करू नका. घर रोज स्वच्छ, नीटनेटकं ठेवा. या गोष्टींनी मन आणि मेंदूला आराम मिळेल, आपली एनर्जीही संपणार नाही.
