सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट कॉमन झाली आहे ती म्हणजे सततचा मानसिक थकवा. फोनच्या स्क्रिनपासून ते ऑफिसच्या डेडलाईन्सपर्यंत, नात्यांचा ताण, भविष्याची चिंता आपल्या जणू काही शांतच बसू देत नाही.(Deep Breathing Benefits) दिवस संपतो पण डोक्यातले विचार मात्र थैमान घालत असतात. अंथरुणावर पडूनही झोप काही लागत नाही. इतकंच नाही तर अनेकजण वर वर हसतात- खेळतात पण आतून मात्र कोलमडून जातात. सततच येणारं नैराश्य, चिंता आणि थकव्याचा सामना करतात. (Panic Attack Relief Tips)
सततची धावपळ, अपुरी झोप, सोशल मीडियाचा वाढता वापर, कामाचा दबाव आणि स्वतःसाठी वेळ न मिळणं. या छोट्या गोष्टीदेखील मनावर मोठा परिणाम करू लागल्या आहेत. अशावेळी अनेकजण शांतता शोधण्यासाठी महागड्या थेरपी, ट्रिप्स किंवा डिजिटल डिटॉक्सकडे वळतात.(Easy Meditation Techniques) पण कधी कधी आपल्या श्वासांनी मन शांत करता येते. आपल्या शरीरात एक असा 'रिसेट' (Reset) बटण आहे. ज्याचा वापर करून आपण फक्त ५ सेकंदात या मानसिक जंजाळातून बाहेर पडू शकतो ते बटण म्हणजेच आपला 'श्वास'! 'बॉक्स ब्रीदिंग' (Box Breathing) मध्ये लोकप्रिय असणारा '४-७-८' उपाय. हा फक्त श्वास घेण्याचा व्यायाम नाही, तर आपल्या हायपर मोडवर गेलेल्या मेंदूला एका झटक्यात कुल (Cool) करणारं नॅचरल टूल आहे. जर आपल्यालाही सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मानसिक थकवा येत असाल, तर हा सोपा 'डिजिटल डिटॉक्स' उपाय आपल्यासाठी गेम-चेंजर ठरेल.
प्रेम म्हणजे..नक्की काय असतं, महागडं गिफ्ट की रोमॅण्टिक मेसेज? खरंखुरं प्रेम ओळखण्यासाठी ५ टिप्स
'४-७-८' ब्रीदिंग टेक्निक ही भारतीय प्राचीन प्राणायाम पद्धतीवर आधारित आहे. आयुर्वेदानुसार ज्यावेळी आपला मानसिक ताण वाढतो, आपण चिंतेत असतो तेव्हा आपले हृदय जोरजोरात धडधडू लागते, ज्यामुळे श्वास व्यवस्थित घेता येत नाही. अशावेळी ४-७-८ चा उपाय करायला हवा. शरीरातील 'पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टीम' सक्रिय झाल्यास शरीर रिलॅक्स होते.
४-७-८ म्हणजे काय ?
४ सेकंद- नाकाने हळूवारपणे श्वास आत घेणे.
७ सेकंद- श्वास फुफ्फुसात रोखून (Hold) ठेवणे.
८ सेकंद- तोंडाने हळूच श्वास पूर्णपणे बाहेर सोडणे.
Box Breathing कसं करावं?
सगळ्यात आधी आरामदायी स्थितीत पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. डोळे बंद करा आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. आपली वरची जीभ दातांच्या मागे हिरड्यांना टेकवून ठेवा. मनातल्या मनात १ ते ४ आकडे मोजून नाकाने खोल श्वास आत घ्या. हा श्वास रोखून धरा आणि पुन्हा मनातल्या मनात १ ते ७ अंक मोजा. यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण संतुलित राहते आणि मेंदूला विश्रांती मिळते. आता तोंड हलके उघडून 'शूउउ' असा आवाज करत ८ सेकंदांपर्यंत श्वास हळूहळू पूर्णपणे बाहेर सोडा. यामुळे आपला सर्व ताण निघून जाईल.
४-७-८ उपायाचे शरीराला होणारे फायदे
जेव्हा आपल्याला अचानक पॅनिट अटॅक किंवा भीती वाटते तेव्हा हा उपाय करुन पाहा. रात्री झोप येत नसेल तर हा उपाय केल्यास शांत गाढ झोप लागेल. सतत चिडचिड किंवा राग येत असेल तर ४-७-८ चा उपाय करा. राग झटक्यात शांत होईल. ऑफिसमध्ये काम करताना थकवा आल्यास ५ मिनिटे हे केल्याने मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि कार्यक्षमता वाढते.
