Brain Signals : आपण अनुभवलं असेल की, आपण जेवायला बसतो, जेवण करत असतो आणि एक वेळ अशी येते जेव्हा आपला मेंदू सांगतो की, आता नको...पोट भरलंय. आतापर्यंत वैज्ञानिकांना हेच वाटत होतं की, भूक आणि तृप्तीलाा केवळ न्यूरॉन्स म्हणजे मेंदूला संकेत पाठवणाऱ्या कोशिकाच कंट्रोल करत आहेत. पण एका नव्या संशोधनातून ही धारणा बदलून गेली आहे.
मेरीलँड यूनिव्हर्सिटी आणि चिली कॉन्सेप्सिअन यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमधून याबाबत एक वेगळी आणि नवीन माहिती समोर आलीये. वैज्ञानिकांनी मेंदूच्या हायपोथॅलेमस भागातील एका अशा चेन रिअॅक्शनचा शोध लावला आहे, ज्याचा संबंध भूक आणि तृप्तीशी आहे.
वैज्ञानिकांनुसार, मेंदूचा हायपोथॅलेमस भाग शरीराची भूक आणि तहान कंट्रोल करतो. संशोधनातून आढळून आलंय की, जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा रक्तात ग्लूकोज लेव्हल वाढणं सुरू होते आणि हे मेंदूच्या टॅनीसाइट्स कोशिका ओळखून घेतात. या कोशिका म्हणजे पेशी लॅक्टेट नावाचं केमिकल रिलीज करतात. याच चेन रिअॅक्शनमधून मेंदूला संकेत मिळतो की, पोट भरलं आहे.
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, एस्ट्रोसाइट्स केवळ न्यूरॉन्सला सपोर्ट देणाऱ्या कोशिका आहेत. पण रिसर्च सांगतो की, या कोशिकाच खऱ्या संकेत वाहक आहेत. म्हणजे जेव्हा टॅनीसाइट्सने लॅक्टेट निघतो, तेव्हा एस्ट्रोसाइट्स अॅक्टिव होतो आणि ग्लूटामेट नावाचा सिग्नल पाठवतात. हा संकेत थेट त्या न्यूरॉन्सपर्यंत जो भूकेला दाबतो. म्हणजे याने भूक वाढवणारे न्यूरॉन्स शांत होतात आणि दुसरीकडे पोट भरल्याचे संकेत अधिक वाढतात.
महत्वाची बाब म्हणजे हे संशोधन केवळ माहिती मिळण्यापुरतं मर्यादित नाही. वैज्ञानिकांचं मत आहे की, ही शरीरातील कम्युनिकेशन चेन समजल्याने भविष्यात लठ्ठपणा आणि खाण्यासंबंधी आजारांवर ठोस असा उपाय शोधला जाऊ शकतो. जर हे सिग्नल औषधांद्वारे कंट्रोल केले गेले तर सहजपणे शरीराला ही जाणीव करून दिली जाऊ शकेल की, त्याला आता कॅलरीची गरज नाही. असं झाल्यास व्यक्ती कमी खाईल आणि वजनही कमी राहणार.
