Hair Care During Periods: मासिक पाळीसाठी वेगवेगळे नियम आजही चर्चेत असतात. एक नेहमीचा प्रश्न असतो की मासिक पाळीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केस धुवायचे की नाही? वाट्टेल ते रिल पाहून मतं ठरवू नका. मासिक पाळीत केस धुण्यानं काहीही अपाय होत नाहीत.
दावे काय केले जातात?
१. मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्रावामुळे शरीर कमजोर होतं आणि केस धुतल्यानंतर शरीरात अधिक थकवा जाणवण्याचा धोका असतो.
२. केस भिजल्यामुळे सर्दी आणि ताप येण्याचा धोकाही वाढू शकतो. ज
३. केसांवर अचानक भरपूर पाणी टाकल्यानं शरीरातील ब्लड फ्लो वर सुद्धा प्रभाव पडू शकतो.
हे अजिबात खरं नाही.
१. मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, मूड स्विंग्स, कमजोरी, थकवा जाणवतो. शरीर थोडं संवेदनशील होतं. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आंघोळ करणं किंवा केस धुणं सोडलं पाहिजे. उलट या दिवसांमध्ये स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी लागते. जेणेकरून इन्फेक्शनपासून बचाव व्हावा.
२. मासिक पाळीदरम्यान केस धुणं एकदम सेफ आहे. असं केल्यास काहीच नुकसान होणार नाही. उलट आंघोळ केल्यावर तुम्हाला चांगलं वाटेल आणि मूडही चांगला राहील. कोमट पाण्यानं आंघोळ केल्यास स्नायूंना आराम मिळेल. स्वच्छता असेल तर बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनपासून बचावही होईल.