Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात लघवीचा रंग गडद पिवळा दिसतो? डॉक्टर सांगतात, पिवळी लघवी म्हणजे शरीरात होत आहेत ‘हे’ बदल...

उन्हाळ्यात लघवीचा रंग गडद पिवळा दिसतो? डॉक्टर सांगतात, पिवळी लघवी म्हणजे शरीरात होत आहेत ‘हे’ बदल...

why urine turns yellow in summer : yellow urine causes in summer : उन्हाळ्यात लघवीचा रंग का बदलतो? डॉक्टर सांगतात महत्त्वाचं कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 14:36 IST2026-05-19T14:32:19+5:302026-05-19T14:36:56+5:30

why urine turns yellow in summer : yellow urine causes in summer : उन्हाळ्यात लघवीचा रंग का बदलतो? डॉक्टर सांगतात महत्त्वाचं कारणं...

why urine turns yellow in summer yellow urine causes in summer dark yellow urine meaning reasons for yellow urine | उन्हाळ्यात लघवीचा रंग गडद पिवळा दिसतो? डॉक्टर सांगतात, पिवळी लघवी म्हणजे शरीरात होत आहेत ‘हे’ बदल...

उन्हाळ्यात लघवीचा रंग गडद पिवळा दिसतो? डॉक्टर सांगतात, पिवळी लघवी म्हणजे शरीरात होत आहेत ‘हे’ बदल...

सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरु आहे. जेव्हा उन्हाळा अधिक तीव्र होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. जास्त घाम येणे, सतत तहान लागणे, थकवा जाणवणे अशा समस्या सामान्य असतात, पण यासोबतच आपल्या लघवीचा रंग गडद पिवळा होत असल्याचे लक्षात येते. काही लोकांना या पिवळ्या रंगासोबतच तीव्र दुर्गंधी, सौम्य जळजळ किंवा वारंवार तहान लागणे अशा समस्याही जाणवू शकतात(why urine turns yellow in summer).

काहीजण याकडे दुर्लक्ष करतात, तर काहींना (yellow urine causes in summer) हे नेमकं असं  का होतं याबद्दल प्रश्न पडतो. अशावेळी काहीजण घाबरून जातात आणि विचार करू लागतात की, हा कुठल्या मोठ्या आजाराचा संकेत तर नाही ना? लघवीचा रंग अचानक गडद पिवळा होणं हे सामान्य आहे की चिंता करण्यासारखी गोष्ट हेच नेमके समजत नाही. यासाठीच, लघवीच्या रंगातील बदलामागचं नेमकं कारण आणि त्याकडे कधी गांभीर्याने लक्ष द्यायला हवं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. शकयतो, नेमकं उन्हाळ्यातच (reasons for yellow urine) आपल्या लघवीचा रंग गडद का होतो यामागची कारणं नेमकी काय ते पाहूयात. 

उन्हाळ्यात लघवीचा रंग गडद पिवळा असतो कारणं... 

नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे व्हाईस चेअरमन डॉ. अमरेंद्र पाठक यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, उन्हाळ्यात शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी जास्त घाम शरीराबाहेर टाकते. आपल्या घामावाटे शरीरातील पाणी आणि काही महत्त्वाचे खनिजे शरीरा  बाहेर पडतात. जर या काळात व्यक्तीने पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले नाही, तर शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच 'डिहायड्रेशन' (Dehydration) होऊ लागते. डिहायड्रेशनमुळे लघवी कन्संट्रेट (घट्ट) होते आणि त्याचा रंग जास्त पिवळा होतो. जेव्हा शरीरात पाणी कमी होऊ लागते, तेव्हा किडनी शरीरातील पाणी वाचवण्याचा प्रयत्न करते. याच कारणामुळे लघवी जास्त घट्ट आणि पिवळी दिसून येते.

जाडजूड मांड्या आणि हिप्सवरील चरबी होईल कमी! आहारात हवेच ८ पदार्थ - सुपरफूड देतील स्लिम - फिट लूक...

डॉक्टरांच्या मते, लघवीचा रंग 'युरोक्रोम' (Eurochrome) नावाच्या एका नैसर्गिक पिगमेंटमुळे (रंगद्रव्यामुळे) हलका पिवळा असतो. सामान्य परिस्थितीत जेव्हा शरीर पूर्णपणे हायड्रेटेड असते (शरीरात पुरेसे पाणी असते), तेव्हा लघवीचा रंग हलका पिवळा दिसतो. मात्र, जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, तेव्हा लघवीमध्ये असलेला हा युरोक्रोम जास्त कन्संट्रेटेड (घट्ट) होतो. यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा किंवा डार्क दिसू लागतो. हेच कारण आहे की, पुरेसे पाणी प्यायल्यानंतर लघवीचा रंग पुन्हा हलका होऊ लागतो.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळा आणि डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) हे लघवी पिवळी होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. मात्र, प्रत्येक वेळी यामागचे कारण फक्त उन्हाळाच असेल असे नाही. अनेकदा काही औषधे आणि व्हिटॅमिन सप्लीमेंट्समुळेही (जीवनसत्त्वाच्या गोळ्या) लघवीचा रंग बदलू शकतो. विशेषतः 'व्हिटॅमिन-बी' (Vitamin-B) सप्लीमेंट घेतल्यानंतर अनेक लोकांची लघवी चमकदार पिवळी दिसू शकते. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये लिव्हरचे आजार (यकृताचे आजार), युरिन इन्फेक्शन (मूत्रमार्गाचा संसर्ग) किंवा किडनीशी संबंधित समस्यांमुळेही लघवीचा रंग गडद होऊ शकतो. जर बऱ्याच दिवसांपर्यंत लघवीचा रंग गडद पिवळाच राहत असेल, तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

उन्हाळ्यात भरपूर पाणी पिऊनही लघवी कमी होते कारणं...५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका - पाहा नेमकं काय बिघडतंय...

लघवीचा रंग गडद पिवळा होऊ नये म्हणून... 

१. उन्हाळ्यात अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे टाळा, कारण यामुळे डिहायड्रेशन वाढते. सोबतच जास्त तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा.
२. १ चमचा धणे आणि १ चमचा जिरे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून प्या.
३. फक्त पाणी पिण्यासोबतच आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळे समाविष्ट करा.
४. लिंबू पाणी हे शरीरातील टॉक्सिन्स (विषारी घटक) बाहेर काढण्यास मदत करते. यात विटामिन-सी भरपूर असल्याने युरिन इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो.
५. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा उत्तम स्त्रोत आहे. उन्हाळ्यात घामावाटे निघून गेलेले मिनरल्स हे भरून काढते आणि लघवीची जळजळ व पिवळेपणा झटकन दूर करते.
६. ताक शरीराला थंडावा देते. तसेच, वाळा रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमालीची कमी होते.

Web Title : गर्मी में गहरा पीला पेशाब: कारण और डॉक्टर की राय।

Web Summary : गर्मी में गहरा पीला पेशाब अक्सर डिहाइड्रेशन के कारण होता है। डॉ. अमरेंद्र पाठक बताते हैं कि पसीने से पानी की कमी होती है। किडनी मूत्र को गाढ़ा करती है, जिससे रंग बदलता है। हालांकि, लीवर की समस्या, संक्रमण और कुछ सप्लीमेंट्स भी कारण हो सकते हैं। हाइड्रेटेड रहें और लगातार रहने पर डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Dark yellow urine in summer: Causes and what doctors say.

Web Summary : Dark yellow urine in summer is often due to dehydration. Dr. Amarendra Pathak explains that sweating leads to water loss. Kidneys concentrate urine, causing the color change. However, liver issues, infections, and certain supplements can also be culprits. Stay hydrated and consult a doctor if persistent.