कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

Updated:May 19, 2026 13:18 IST2026-05-19T13:13:55+5:302026-05-19T13:18:21+5:30

कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

सुंदर दिसण्यासाठी नेहमी महागडे काॅस्मेटिक्सच वापरायला हवेत असं मुळीच नसतं. कारण महागडे कॉस्मेटिक्स वरवरचा इफेक्ट दाखवतात. पण मुळातुनच त्वचेला पोषण देऊन सौंदर्य खुलवायचं असेल तर पुढे सांगितलेले काही साधे सोपे घरगुती उपाय करायलाच हवेत.

कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

ते उपाय नेमके कोणते याची माहिती डाॅक्टरांनी ughad.ughad या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यासाठी पहिला उपाय म्हणजे रोज पुरेसं पाणी प्या. ही बाब अगदी साधी वाटत असली तरी तुमच्या सौंदर्यात खूप भर घालते. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होतं. त्यामुळे त्वचा कोरडी होते आणि कमी वयातच सुरकुतलेली, निस्तेज दिसू लागते. त्यामुळे रोज योग्य प्रमाणात पाणी प्यायलाच हवं.

कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

रोजच्या जेवणात ताक घ्या. ताक प्रोबायोटीक आहे. म्हणजेच ते अन्न पचनासाठी मदत करतं. अन्न व्यवस्थित पचलं गेलं तर आपोआपच त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या त्वचेवर आणि वजनावर दिसून येतो.

कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

त्वचेचं सौंदर्य आणि तारुण्य टिकवून ठेवायचं असेल तर ओमेगा ३ असलेले पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात असायलाच हवेत. त्यासाठी तुम्ही जवस, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया नियमितपणे खायला हव्या.

कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

याशिवाय रोज भिजवलेले ५ बदाम आणि २ अक्रोड नियमितपणे खा. यातून मिळणारं व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स त्वचेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात.

कशाला हवेत महागडे क्रिम? ५ सोप्या गोष्टी रोज आठवणीने करा- चेहऱ्याचे सौंदर्य नेहमी खुलतच राहील

त्याचबरोबर आपल्या रोजच्या जेवणातून आपल्याला योग्य प्रमाणात प्रोटीन्स आणि लोह मिळतेय की नाही याकडेही लक्ष द्या. कारण तुमचं सौंदर्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी टिकवून ठेवायच्या असतील तर प्रोटीन आणि लोहयुक्त पदार्थ खूप गरजेचे आहेत.