तुमच्याकडे फक्त ३ गुण हवेत, आयुष्यात कधीच एकेकटं वाटणार नाही-खूप माणसं कमवाल..
Updated:May 19, 2026 09:40 IST2026-05-19T09:38:53+5:302026-05-19T09:40:01+5:30

आपल्या आसपास आपण असे कित्येक लोक पाहातो की जे कायम माणासांच्या गराड्यात असतात. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी खूप चांगल्या भावना असतात आणि ते खरोखरच त्यांच्या सर्कलमध्ये अतिशय लोकप्रिय असतात..
आपल्याभोवतीही अशीच आपली प्रेमाची माणसं असावीत असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. पण त्यासाठी काही करण्याची मात्र आपली तयारी हवी. माणसं कमावण्यासाठी ही लोकं असं काय बरं वेगळं करतात...
या लोकांमध्ये असणारा सगळ्यात पहिला गूण म्हणजे ते कोणाविषयीही कधीही वाईट बोलत नाहीत. ना कोणाच्या तोंडावर ना कोणाच्या माघारी.. कारण अशी माघारी वाईट बोलणारी माणसं कोणलाही आवडत नाहीत..
कोणासाठी काहीतरी करताना त्यांना मनापासून आनंद होत असतो. शिवाय आपण कोणासाठी काही केलं आहे याचं ते कधीही स्तोम माजवत नाहीत आणि समोरच्याला ते वारंवार दर्शवूनही देत नाहीत.
लोकप्रिय लोकांमध्ये असणारी तिसरी गोष्ट म्हणजे ते खूप चांगले श्रोते असतात. समाेरचा आपल्याला काय सांगतो आहे हे ते शांतपणे ऐकून घेतात आणि विनाकारण सल्ले देणं टाळतात.