सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी प्यायला नाही असे खूपच क्वचित घडते. बरेच लोक सकाळी चहा-बिस्कीट्स खाऊन दिवसाची सुरूवात करतात. चहा बिस्कीटचे कॉम्बिनेशन भारतात सर्वात जास्त पसंत केले जाते. बऱ्याच लोकांना चहा पिताना बिस्कीट खायला आवडते. लहान मुलंसुद्धा चहात बिस्कीट बुडवून आवडीनं खातात. (Health Is Eating Biscuits With Tea Harmful Experts Kamini Sinha Explain Risks)
सकाळची सुरूवात असो की संध्याकाळ लोक आवडीनं चहा बिस्कीट खातात. पण चहा बिस्कीट खाल्ल्यानं तुमच्या तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते चहा बिस्कीट खाल्ल्यानं तब्येतीच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. हे कॉम्बिनेशन तब्येतीसाठी फार चांगलं मानलं जात नाही.
आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. रोज चहा बिस्कीट खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. यात बिस्कीट, मैदा,साखर आणि ट्रांस फॅट असते. यात कॅलरीज भरपूर असतात. जेव्हा तुम्ही बिस्कीट चहात बुडवून खाता तेव्हा लठ्ठपणा वाढतो. यात फायबर्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पोट लवकर भरत नाही आणि सतत खाण्याची इच्छा होते. चहात साखर आणि कॅफेनचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे चहाचे अतिसेवन नुकसानकारक मानले जाते.
आहारतज्ज्ञांच्यामते गोड बिस्कीटं, चहात घातलेली साखर, शरीराची ग्लुकोज लेव्हल वेगानं वाढवते. यामुळे इंसुलिन रेजिस्ंटस आणि टाईप 2 डायबिटीसचा धोका वाढतो. जे लोक आधीपासून प्री डायबिटीक आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते. बिस्किटमधील ट्रांसफॅट्स आणि रिफाईन तेल रक्तात बॅड कोलेस्टेरॉल वाढवते. ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. दीर्घकाळ याचे सेवन केल्यानं हार्ट डीसिजही वाढतात. जर तुम्हाला आधीपासून हाय कोलेस्टेरॉल किंवा हार्ट डीसिज असतील तर हे कॉम्बिनेशन टाळायला हवं.
एक्सपर्ट्सच्यामते चहा बिस्कीट्स जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे पोटात गॅस तयार होणं, पोट जड वाटणं अशा समस्या उद्भवतात आणि तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम हळूहळू कमकुवत होऊ शकते. दातांमध्ये वेदना, त्वचेच्या समस्या, पिंपल्स उद्भवू शकतात. चहासोबत बिस्कीट्स खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
