किडनी स्टोनचा त्रास आता खूप वाढला आहे. हा त्रास असणारे बरेच रुग्ण आपण आपल्या आजुबाजुला पाहात असतो. यामध्ये किडनीत स्टोन तयार होतात आणि त्यामुळे प्रचंड पोटदुखीचा त्रास होतो. बऱ्याचदा तर स्टोनचा आकार मोठा असेल तर त्यासाठी ऑपरेशनही करावं लागतं. एकदा हे स्टोन काढून टाकले तरी ते पुन्हा होण्याची शक्यता खूप जास्त असते. किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर पाणी भरपूर प्रमाणात प्यायला हवं, असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण फक्त तेवढं करूनच उपयोग नसतो. फक्त पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवून किडनी स्टोनचा त्रास कमी होत नाही. त्यासाठी काही इतर गोष्टी करणंही गरजेचं आहे, असं नुकतंच एका अभ्यासातून समोर आलं आहे. बघुया तो अभ्यास नेमकं काय सांगतो...(drinking more water can really prevent kidney stone?)
किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
किडनी स्टोनचा त्रास आणि त्यावर पाणी पिण्याचा उपाय याविषयीचा अभ्यास The Lancet या मेडिकल जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला.
उन्हाळ्यात चेहऱ्याला 'या' पद्धतीने लावा आमसुलाचा थंडगार लेप- टॅनिंग, पिगमेंटेशन जाऊन त्वचा उजळेल
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की फक्त योग्य प्रमाणात पाणी पिऊन तुमचं शरीर हायड्रेटेड राहण्यास नक्कीच मदत होईल, पण त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास पुर्णपणे कमी होऊ शकत नाही. यामध्ये किशोरवयीन मुला- मुलींपासून ते वयस्कर लोकांपर्यंत एकूण १६५८ लोकांचा अभ्यास करण्यात आला. या लोकांना आधीपासूनच किडनी स्टोनचा त्रास होता.
या लोकांचे दोन गट करण्यात आले. यापैकी एका ग्रुपला पाणी पिण्याचा सल्ला दिला गेला तर दुसऱ्या ग्रुपसाठी पाणी पिण्यासोबतच एक हायड्रेशन प्रोग्राम तयार करण्यात आला.
उन्हाळ्यात केसांना कोणतं तेल लावणं योग्य? केस चिकट, चिपचिपीत होऊ नये म्हणून खास उपाय
यामध्ये असं दिसून आलं की पहिल्या गटातल्या लोकांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलं पण तरीही त्यातल्या १० पैकी ५ लोकांना पुन्हा किडनीस्टोनचा त्रास सुरू होऊ लागला. त्यामुळे जर किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर फक्त पाणी पिण्यावर भर देऊन उपयोग नाही. हा त्रास टाळण्यासाठी तुमचा आहार, जीवनशैली योग्य हवी. ऋतुमानानुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहारात बदल करायला हवा.. तरच तुमचा त्रास कमी होऊ शकतो.
