सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खाणं शरीरासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. मात्र रोजचे पोहे, उपमा किंवा ब्रेड खाऊन अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी झटपट तयार होणारे आणि भाज्यांनी भरपूर असलेले रव्याचे पॅनकेक हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. रवा, गाजर, शिमला मिरची, कांदा आणि इतर भाज्यांचा वापर करून तयार केलेले हे पॅनकेक चवदार तर लागतातच, शिवाय शरीराला आवश्यक पोषणही देतात. विशेष म्हणजे हे पॅनकेक मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडू शकतात. कमी तेलात तयार होणारा हा हेल्दी नाश्ता वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो(Suji Vegetable Pancake Recipe).
मुलांना भाज्या खाऊ घालणे म्हणजे पालकांसाठी मोठे कठीण काम...मुले पालेभाज्या किंवा इतर भाज्या बघताच तोंड वाकडं करतात. पण जर याच भाज्या आपण रव्याच्या पॅनकेकमध्ये लपवून दिल्या, तर मुले अगदी आवडीने खातील! रव्याचा कुरकुरीतपणा आणि भाज्यांचा नैसर्गिक स्वाद यामुळे हे पॅनकेक मुलांच्या आवडीचा पदार्थ होतो. सकाळच्या घाईत मुलांच्या डब्याला काय द्यायचे किंवा नाश्त्याला झटपट काय बनवायचे, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. अशावेळी चविष्ट आणि तितकेच पौष्टिक काहीतरी हवे असेल, तर 'रवा आणि भाज्यांचे पॅनकेक' हा एक उत्तम पर्याय आहे. रवा आणि तुमच्या (Rava & Vegetable Pancake Recipe) आवडीच्या भरपूर रंगीबेरंगी भाज्या वापरून तयार होणारे हे पॅनकेक केवळ दिसायलाच आकर्षक नसतात, तर ते फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. कमी तेलात (How To Make Suji Vegetable Pancake At Home) तयार होणारा हा नाश्ता संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. रवा आणि भरपूर भाज्या घालूंन केलेले चटपटीत, पौष्टिक पॅनकेक कसे करायचे याची रेसिपी पाहा.
साहित्य :-
१. बारीक रवा - १ कप
२. बेसन - १ टेबलस्पून
३. मीठ - चवीनुसार
४. दही - १ कप
५. पाणी - गरजेनुसार
६. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
७. मोहरी - १ टेबलस्पून
८. कडीपत्त्याची पाने - ५ ते ६ पाने
९. हिरव्या मिरच्या - ३ ते ४
१०. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)
११. गाजर - १/२ कप (बारीक किसलेलं)
१२. फरसबी - १/२ कप (बारीक चिरलेली)
१३. टोमॅटो - १/२ कप (बारीक चिरलेला)
१४. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१५. इनो - १ टेबलस्पून
अधिक मास विशेष : वाणाचे अनारसे जमतील परफेक्ट लक्षात ठेवा ५ टिप्स, खुसखुशीत अनारसे करा घरीच...
साय साठवा-घुसळा ताक ही झंझटच नको, करा दह्याचं लोणी झटपट-पाहा भन्नाट ट्रिक...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा, बेसन, चवीनुसार मीठ, दही आणि गरजेनुसार पाणी घालून रवा व्यवस्थित भिजवून घ्यावा. मिश्रण ५ मिनिटे झाकून ठेवावे.
२. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, कडीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक किसलेलं गाजर आणि चिरलेली फरसबी आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित तेलात परतवून घ्यावे.
जाडजूड मांड्या-पोटाचा घेर कमी करतो शेवग्याच्या पानांचा उपाय, वेटलॉससाठी शेवगा असरदार...
३. पॅनमध्ये परतवून घेतलेल्या भाज्या रव्याच्या मिश्रणात टाकून मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.
४. याच बॅटरमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, इनो आणि पाणी घालून बॅटर मध्यम कंन्सिस्टंसीचे तयार करून घ्यावे.
५. पॅनला तेल लावून त्यावर तयार बॅटर घालूंन डोशाप्रमाणे गोलाकार आकार द्यावा, चारही बाजूने तेल सोडून खरपूस भाजून घ्यावा. दोन्ही बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घ्याव्यात.
रवा आणि भरपूर भाज्या घातलेले पौष्टिक पॅनकेक खाण्यासाठी तयार आहे. सॉस आणि चटणी सोबत हे पॅनकेक अधिक टेस्टी लागतात.
