Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वाळवण स्पेशल: नको तांदूळ- नको गहू, रव्यापासून करा पांढरीशु्भ्र कुरडई, चीक शिजवताना ३ चुका टाळा- भरपूर फुलेल

वाळवण स्पेशल: नको तांदूळ- नको गहू, रव्यापासून करा पांढरीशु्भ्र कुरडई, चीक शिजवताना ३ चुका टाळा- भरपूर फुलेल

Tips to avoid lumps in Kurdai chik: ravyachi kurdai recipe: रव्याची कुरडई कशी बनवायची आणि चीक शिजवताना कोणत्या ३ चुका टाळायच्या, ज्यामुळे कुरडई दुप्पट फुलेल. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 09:30 IST2026-04-15T09:30:00+5:302026-04-15T09:30:02+5:30

Tips to avoid lumps in Kurdai chik: ravyachi kurdai recipe: रव्याची कुरडई कशी बनवायची आणि चीक शिजवताना कोणत्या ३ चुका टाळायच्या, ज्यामुळे कुरडई दुप्पट फुलेल. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

Rava Kurdai recipe step by step Semolina Kurdai without soaking wheat Traditional Maharashtrian Valvan recipes How to make white and crispy Kurdai at Home | वाळवण स्पेशल: नको तांदूळ- नको गहू, रव्यापासून करा पांढरीशु्भ्र कुरडई, चीक शिजवताना ३ चुका टाळा- भरपूर फुलेल

वाळवण स्पेशल: नको तांदूळ- नको गहू, रव्यापासून करा पांढरीशु्भ्र कुरडई, चीक शिजवताना ३ चुका टाळा- भरपूर फुलेल

उन्हाळ्यात प्रत्येक घरोघरी वाळवणाचे पदार्थ केले जातात. यात कुरडई हा प्रकार सर्वांचा आवडता पण तितकाच वेळ खाऊ मानला जातो.(Rava Kurdai recipe) त्यात सण-वार असो किंवा पाहुण्यांचे जेवण, ताटात कुरडई असल्याशिवाय जेवणाची लज्जत वाढत नाही. सहसा कुरडई म्हटलं की गहू भिजवणे, तो सडवणे, त्याचा चीक काढणे ही लांबलचक आणि कष्टाची प्रक्रिया डोळ्यासमोर येते.(Ravyachi kurdai kashi karaychi) अनेक गृहिणींना गव्हाचा चीक काढणं जमत नाही, त्यामुळे ते कुरडई बनवणं टाळतात. पण गव्हाच्या चिकाइतकीच चविष्ट आणि पांढरीशुभ्र कुरडई आपण रव्यापासून बनवू शकता.(Tips to avoid lumps in Kurdai chik)
रव्याची कुरडई करताना चीक शिजवणं सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. जर चीक व्यवस्थित शिजला नाही तर कुरडई तेलात गेल्यावर विरघळते किंवा लाल पडते.(Kurdai tips and tricks in marathi) रव्याची कुरडई कशी बनवायची आणि चीक शिजवताना कोणत्या ३ चुका टाळायच्या, ज्यामुळे कुरडई दुप्पट फुलेल. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती 

उन्हाळ्यात वेफर्स-पापडासाठी भरपूर बटाटे आणले? ५ टिप्स -बटाटे काळे पडणार नाहीत, मोड येणार नाहीत..

साहित्य 

बारीक रवा - १ किलो
चवीनुसार- मीठ 
पाणी 

कृती 

1. सगळ्यात आधी एका भांड्यात बारीक रवा घ्या. त्यात भरपूर पाणी घालून त्याचा गुठळ्या मोडून घ्या आणि ५ मिनिटे बाजूला ठेवा. वर साचलेले पांढरे पाणी काढून टाका. असं किमान दोन ते तीन वेळा करा. 

2. आता स्वच्छ केलेल्या रव्यात भरपूर पाणी घालून तो भिजत ठेवा. हा रवा सलग दोन दिवस भिजवायचा आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी वरचे पाणी ओतून नवीन ताजे पाणी घालावे. तिसऱ्या दिवशी सकाळी वरचे पाणी पूर्णपणे काढून टाका. भांड्याच्या तळाशी जो दाट पांढरा भाग उरतो, तो चीक असेल. 

3. तयार झालेला चीक एका भांड्याने मोजून घ्या. जेव्हा चीक असेल तेवढ पाणी घेऊन जाड बुडाच्या पातेल्यात गरम करायला ठेवा. पाण्यात चवीनुसार मीठ घालून उकळी येण्यास ठेवा. उकळी आल्यावर एक वाटी गरम पाणी बाजूला काढून ठेवा. 

4. आता गॅसची फ्लेम मंद करा. एका हाताने चीक ओता आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने किंवा रवीने सतत ढवळत राहा. ३ ते ४ मिनिटांत चीक घट्ट होईल. सर्व चीक मधोमध जमा करून त्यावर घट्ट झाकण ठेवा आणि ५ ते ६ मिनिटे वाफ काढा. ५ ते ६ मिनिटांनंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.

5. पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर २५ ते ३० मिनिटे चीक शिजू द्या. दर ४ ते ५ मिनिटांनी ढवळत राहा. १ किलो रव्यासाठी एकूण ३५ ते ४० मिनिटे वेळ लागतो. चीक जेव्हा पारदर्शक, चकचकीत आणि लवचिक होतो, तेव्हा तो तयार झाला असं समजावे.

6. आता गॅस बंद करा. चीक गरम असतानाच कुरडया घालायला सुरुवात करा. साच्यात आवश्यकतेनुसार चीक भरा आणि उरलेला चीक पातेल्यात झाकून ठेवा. प्लास्टिक पेपरवर किंवा सुती कापडावर गोलाकार कुरडया पाडा. या कुरडया कडक उन्हात ३-४ दिवस चांगल्या वाळवून घ्या. पूर्ण वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. या कुरडया वर्षभर चांगल्या राहतात.

Web Title : सूजी की कुरडई रेसिपी: आसान, बिना गेहूं, कुरकुरा ग्रीष्मकालीन नाश्ता

Web Summary : इस गर्मी में सूजी से स्वादिष्ट, बर्फ-सफेद कुरडई बनाएं! गेहूं भिगोने को छोड़ें और मिश्रण को पकाते समय तीन सामान्य गलतियों से बचने का तरीका जानें ताकि आपकी कुरडई पूरी तरह से फूल जाए। इस कुरकुरे, पारंपरिक नाश्ते का आनंद लें।

Web Title : Semolina Kurdai Recipe: Easy, No Wheat, Crispy Summer Snack

Web Summary : Make delicious, snow-white Kurdai from semolina this summer! Skip the wheat soaking and learn how to avoid three common mistakes while cooking the mixture to make sure your Kurdai puffs up perfectly. Enjoy this crispy, traditional snack.