Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखी मऊ, पांढरीशुभ्र इडली घरीच करा; तांदूळ वाटताना २ पदार्थ घाला-परफेक्ट इडली खा

हॉटेलसारखी मऊ, पांढरीशुभ्र इडली घरीच करा; तांदूळ वाटताना २ पदार्थ घाला-परफेक्ट इडली खा

Perfect Idli Making Hacks (How To Make Hotel Style Idli At Home) : उन्हाळ्याच्या दिवसांत इडलीचं पीठ परफेक्ट तयार करणं एखाद्या टास्कप्रमाणे असतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 15:30 IST2026-05-01T15:27:55+5:302026-05-01T15:30:44+5:30

Perfect Idli Making Hacks (How To Make Hotel Style Idli At Home) : उन्हाळ्याच्या दिवसांत इडलीचं पीठ परफेक्ट तयार करणं एखाद्या टास्कप्रमाणे असतं.

Perfect Idli Making Tips : How To Make Soft, Fluffy Idli At Home Secret To Make Perfect Idli | हॉटेलसारखी मऊ, पांढरीशुभ्र इडली घरीच करा; तांदूळ वाटताना २ पदार्थ घाला-परफेक्ट इडली खा

हॉटेलसारखी मऊ, पांढरीशुभ्र इडली घरीच करा; तांदूळ वाटताना २ पदार्थ घाला-परफेक्ट इडली खा

इडली खायला सर्वांनाच आवडते.  उन्हाळ्याच्या दिवसांत घरी केलेलं इडलीचं पीठ खूपच जास्त आंबट होतं असा अनुभव अनेकांना येतो. परफेक्ट इडल्या करण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. उन्हाळ्याच्या दिवसांत इडलीचं पीठ परफेक्ट तयार करणं एखाद्या टास्कप्रमाणे असतं. कारण तापमान  आंबवण्याची प्रक्रिया वेगानं करते. (Secret To Make Perfect Idli At Home)

इडली परफेक्ट होण्यासाठी टिप्स (How To Make Idli Softer)

कमीत कमी ५  ते ६ तासासांठी  ३ वाट्या तांदूळ आणि १ वाटी उडीदाची डाळ भिजवून ठेवा.  उन्हाळ्याच्या दिवसांत पीठ दळण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. कारण मिक्सरमध्ये बॅटर जास्त गरम होऊ शकते. ज्यामुळे इडल्या कडक होतात. 

पिठात जास्त पाणी घालून पातळ करू नका. आवश्यकतेनुसार मीठ घाला. उन्हाळ्याच्या दिवसांत 4 ते 6 तासंच पीठ आंबवण्यासाठी ठेवा. रात्रभरासाठी पीठ ठेवू नका. बॅटर फुलून वर आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून जास्त आंबट होणार नाही आणि इडल्या पांढऱ्याशुभ्र होतील.

इडली मऊ आणि स्पंजी होण्यासाठी स्टिमची टेक्निक वापरा. सांच्यांमध्ये मिश्रण घालण्याआधी व्यवस्थित तेल लावून घ्या.  नंतर इडलीचं पीठ साच्यात घालून मग इडली स्टॅण्डला कुकर किंवा स्टिमरमध्ये ठेवा. मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित वाफवा. इडली शिजल्यानंतर 2 ते 3 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवा. सांभार किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. (How To Make Hotel Style Idli At Home)


इडली करण्यासाठी खास ट्रिक्स

इडलीसाठी तांदूळ भिजवताना २ चमचे मेथी भिजवून ठेवा नंतर तांदूळ वाटताना त्यात मेथी घाला. यामुळे इडली हॉटेलमध्ये मिळतात तशा परफेक्ट होतात. तांदूळ आणि डाळ वाटताना त्यात १ वाटी भिजवलेले पोहे घाला. पोहे घातल्यामुळे पीठ उत्तम तयार होतं आणि इडल्या छान फुलतात, जाळीदार होतात.

इडलीसोबत खाण्यासाठी चटणी कशी करतात?

 मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ, फुटाण्याची डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ एकत्र करा. थोडं पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्या. चटणी फार जास्त पातळ किंवा घट्ट ठेवू नका. गरजेनुसार पाणी घालून ती मध्यम ठेवा. नंतर फोडणी देण्यासाठी एका छोट्या कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात मोहोरी, जीरं, हिंग, कढीपत्ता आणि एखादी सुकलेली लाल मिरची घालून फोडणी द्या.

Web Title : होटल जैसे नरम, सफेद इडली घर पर बनाएं: आसान टिप्स

Web Summary : नरम, सफेद इडली चाहिए? चावल और दाल को 5-6 घंटे भिगोएं। मेथी और पोहा डालकर ठंडे पानी से पीस लें। गर्मियों में 4-6 घंटे फरमेंट करें, फिर भाप लें। नारियल की चटनी के साथ परोसें।

Web Title : Make hotel-style soft, white idlis at home with these tips.

Web Summary : Want soft, white idlis? Soak rice and lentils for 5-6 hours. Grind with cold water, adding fenugreek seeds and poha. Ferment for 4-6 hours in summer, then steam. Serve with coconut chutney.