हल्ली वजनवाढीमुळे किंवा मधुमेह, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड अशा त्रासांमुळे कित्येक जण गव्हाची पोळी खाण्याच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य देत आहेत. पण नव्या पिढीतल्या काही जणांना ज्वारीची भाकरी आवडत नाही किंवा रोज रोज भाकरी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी चवीमध्ये थोडा बदल हवा असेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाची भाकरी करण्याऐवजी मसाला रोटी करून खा. ही मसाला रोटी अगदी पोळीसारखी मऊ होईल (Jowar Masala Roti Recipe). शिवाय तिला चवही खूप छान येईल (masala roti from jowar atta). बघा खास रेसिपी (soft jowar roti recipe)
ज्वारीच्या पिठाची मसाला रोटी करण्याची रेसिपी
१ कप पाणी आणि १ कप ज्वारीचं पीठ
२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
उन्हाळ्यात रोपं टवटवीत ठेवण्याचा सोपा उपाय- पानाफुलांनाही मिळेल थंडावा आणि राहतील फ्रेश
चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरेपूड
धनेपूड, जिरेपूड प्रत्येकी एकेक टीस्पून आणि थोडासा ओवा व तीळ
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये पाणी घाला. पाण्यामध्ये मीठ, ओवा, मिरेपूड, धनेपूड, जिरेपूड, तीळ असं सगळं घाला.
पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडं थोडं करत घाला आणि चमच्याने हलवून एकजीव करून घ्या. यानंतर कढईवर झाकण ठेवून द्या. पीठ थंड झालं की ते एका परातीमध्ये काढा. गरज वाटल्यास थोडं कोमट पाणी घालून कणिक मळतो तसे ज्वारीचे पीठ मळून घ्या. यानंतर त्याचे लहान लहान गोळे करा आणि फुलके लाटून घ्या. या मसाला रोटीवर छान तूप घालून खा. चवीला अतिशय उत्तम लागते. एकदा ट्राय करून पाहा.
