Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणताना ‘ही’ १ चूक टाळा...

आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणताना ‘ही’ १ चूक टाळा...

how to store mangoes properly : mango storage tips at home : proper way to store mangoes : महागडे आणि रसाळ आंबे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठीची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 18:07 IST2026-04-15T18:04:19+5:302026-04-15T18:07:45+5:30

how to store mangoes properly : mango storage tips at home : proper way to store mangoes : महागडे आणि रसाळ आंबे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठीची योग्य पद्धत...

how to store mangoes properly mango storage tips at home proper way to store mangoes | आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणताना ‘ही’ १ चूक टाळा...

आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणताना ‘ही’ १ चूक टाळा...

उन्हाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते रसाळ आणि गोडमधुर चवीच्या आंब्यांचे! मग तो हापूस असो, पायरी असो किंवा केशर; आंबा पाहिला की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. या सिझनमध्ये आपण आवडीने डझनांच्या हिशोबात हमखास आंबे विकत आणतो, पण खरा प्रश्न तेव्हा पडतो जेव्हा हे महागडे आंबे साठवून ठेवण्याची वेळ येते. अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे आंबे लवकर खराब होतात किंवा काळे पडतात. अशावेळी गृहिणींसमोर एक मोठा प्रश्न उभा राहातो - आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेरच? फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांचा नैसर्गिक गोडवा कमी होतो का? की बाहेर ठेवल्याने ते लवकर सडतात? महागडे आणि रसाळ आंबे वाया जाऊ नयेत यासाठी योग्य साठवणूक पद्धत जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे(how to store mangoes properly).

आपल्यापैकी बरेचजण आंबे आणल्या आणल्या थेट फ्रिजमध्ये कोंबतात, तर काहीजण ते बाहेरच ठेवतात. परंतु आंब्याचं तापमान आणि साठवण्याची पद्धत चुकीची असेल, तर त्याची नैसर्गिक चव आणि गोडवा कायमचा निघून जाऊ शकतो. मग आंबे फ्रिजमध्ये ठेवणं योग्य आहे की ते बाहेरच ठेवलेले बरे? महागडे आणि रसाळ (mango storage tips at home) आंबे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठीची योग्य पद्धत कोणती...जर तुम्हालाही सीझनभर आंब्याचा आस्वाद (proper way to store mangoes) घ्यायचा असेल, तर या सोप्या 'स्टोरेज ट्रिक्स' उपयोगी येतील. 

१. कच्चे आणि पिकलेले आंबे यातील फरक समजून घेणे गरजेचे...

 सर्वात आधी तुमचे आंबे कच्चे आहेत की पिकलेले, हे ओळखणे महत्त्वाचे आहे; कारण त्यावरच ते कुठे साठवायचे हे अवलंबून असते. जर आंबे अजून कडक असतील आणि थोडे हिरवे दिसत असतील, तर ते कच्चे आहेत. अशा कच्च्या आंब्यांना फ्रिजमध्ये ठेवणे ही सर्वात मोठी चूक ठरते. याउलट, जर आंबे मऊ झाले असतील आणि त्यातून गोड सुगंध येऊ लागला असेल, तर समजावे की आंबे पिकलेले आहेत आणि त्यांना आता योग्य पद्धतीने साठवण्याची गरज आहे.

२. कच्चे आंबे कुठे आणि कसे ठेवावेत...

कच्चे आंबे नेहमी रुम टेम्परेचरला ठेवावेत. आंबे अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा खेळती राहील. तुम्ही हवे असल्यास वर्तमानपत्रावर किंवा सुती कापडावर आंबे पसरवून ठेवू शकता.

चहा होतो  फेसाळ, चव मात्र पाणचट ? 'ही' छोटी चूक टाळा - करा फक्कड चहा...

३. पिकलेले आंबे फ्रिजमध्ये का ठेवावेत?

जेव्हा आंबे पूर्णपणे पिकतात, तेव्हा त्यांना फ्रिजमध्ये ठेवणे योग्य ठरते. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांच्या अधिक पिकण्याची प्रक्रिया मंदावते आणि ते जास्त दिवस खराब होत नाहीत. पिकलेले आंबे फ्रिजमधील खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवावेत. लक्षात ठेवा की, आंबे कधीही पूर्णपणे बंद डब्यात ठेवू नका, कारण त्यांना थोडी हवा मिळणे आवश्यक असते. तुम्ही आंबे उघड्या ट्रेमध्ये किंवा कागदी पिशवीत हलके कव्हर करून ठेवू शकता.

४. कापलेले आंबे स्टोअर करण्याची योग्य पद्धत...

जर तुम्ही आंबा कापला असेल आणि तो शिल्लक राहिला असेल, तर तो कधीही असाच उघडा ठेवू नका. कापलेले आंबे हवेच्या संपर्कात आले की लगेच काळे पडू लागतात आणि त्यांची चवही बदलू शकते. कापलेले आंब्याचे तुकडे नेहमी हवाबंद डब्यात ठेवूनच फ्रिजमध्ये ठेवावेत. तुम्ही हवं असल्यास या तुकड्यांवर लिंबाच्या रसाचे काही थेंब शिंपडू शकता. यामुळे आंब्याचा रंग आणि चव दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

इडली-डोशाच्या पिठावर 'वि़ड्याचे पान' ठेवा आणि कमाल पहा! इडल्या मऊलुसलुशीत तर डोसा होईल कुरकुरीत... 

५. आंबे दीर्घकाळ साठवण्यासाठी सोपी ट्रिक...

जर तुम्हाला आंबे जास्तीत जास्त दिवस ताजे ठेवायचे असतील, तर ही एक सोपी पद्धत नक्की वापरुन पहा. आंब्याच्या देठाच्या भागावर पेपर टॉवेल गुंडाळून ठेवा. यामुळे तिथे जमा होणारी आर्द्रता पेपरद्वारे शोषली जाते आणि आंबे लवकर खराब होत नाहीत. जर तुम्ही आंबे फ्रिजबाहेर ठेवत असाल, तर दर दोन दिवसांनी देठावरचा पेपर बदलत राहा. ही छोटीशी ट्रिक तुमचे आंबे सडण्यापासून वाचवते आणि ते जास्त काळ खराब न होता फ्रेश ठेवते. 

६. आंबे खराब होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या छोट्या चुका... 

बरेचजण आंबे बाजारातून आणल्या आणल्या लगेच फ्रिजमध्ये ठेवतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे आंबे पिकण्याची प्रक्रिया थांबते आणि त्यांची चवही फिकी पडू शकते. तसेच, काही लोक कापलेले आंबे थेट असेच फ्रिजमध्ये ठेवून स्टोअर करतात, ज्यामुळे ते लवकर खराब होतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की, आंबा कच्चा आहे की पिकलेला हे पाहूनच त्याची योग्य पद्धतीने साठवणूक करावी.

Web Title : आम को सही तरीके से स्टोर करें: फ्रिज या पारंपरिक तरीका? ये गलती न करें!

Web Summary : आम को ज़्यादा समय तक ताज़ा रखने के लिए सही तरीके से स्टोर करना सीखें। पके आमों को फ्रिज में रखें, जबकि कच्चे आमों को कमरे के तापमान पर रखें। स्वाद बनाए रखने और खराब होने से बचाने के लिए कटे हुए आमों को खुला रखने से बचें।

Web Title : Store Mangoes Right: Fridge or Traditional Method? Avoid This Mistake!

Web Summary : Learn how to properly store mangoes to keep them fresh longer. Ripe mangoes should be refrigerated, while unripe ones should be kept at room temperature. Avoid storing cut mangoes uncovered to preserve flavor and prevent spoilage.