Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चहा होतो फेसाळ, चव मात्र पाणचट? 'ही' छोटी चूक टाळा - करा फक्कड चहा...

चहा होतो फेसाळ, चव मात्र पाणचट? 'ही' छोटी चूक टाळा - करा फक्कड चहा...

how to make perfect tea at home : how to make strong and tasty chai : perfect chai recipe tips : चहा होतो नुसताच फेसाळ, चव मात्र पाणचट ? चवीत हवा असेल दुपटीने बदल, तर 'ही' छोटी चूक करणं टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 15:18 IST2026-04-15T15:08:24+5:302026-04-15T15:18:25+5:30

how to make perfect tea at home : how to make strong and tasty chai : perfect chai recipe tips : चहा होतो नुसताच फेसाळ, चव मात्र पाणचट ? चवीत हवा असेल दुपटीने बदल, तर 'ही' छोटी चूक करणं टाळा...

how to make perfect tea at home how to make strong and tasty chai perfect chai recipe tips | चहा होतो फेसाळ, चव मात्र पाणचट? 'ही' छोटी चूक टाळा - करा फक्कड चहा...

चहा होतो फेसाळ, चव मात्र पाणचट? 'ही' छोटी चूक टाळा - करा फक्कड चहा...

सकाळची सुरुवात असो किंवा थकलेल्या दुपारी थोडी तरतरी आणायची असो - एक कप चहा सगळ्यांचाच मूड फ्रेश करतो...आपल्याकडे चहा म्हणजे केवळ एक पेय नाही, तर ते अनेकांसाठी एक 'इमोशन' आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळच्या थकव्यापर्यंत आपल्याला फक्त वाफाळलेला आणि कडक चहाच तरतरी देतो. पण अनेकदा चहा बनवताना वर भरपूर फेस येतो, चहा दिसायला छान वाटतो, पण चव मात्र काही खास लागत नाही. मग प्रश्न पडतो - चहा बनवताना नेमकं चुकतं कुठे? अनेकदा चहा फेसाळलेला तर दिसतो, पण पिऊ लागल्यावर त्यात ना तो आल्याचा तिखटपणा जाणवतो ना चहापावडरचा खरा सुवास...असा चहा केवळ फेसाळलेला आणि चवीला बेचव लागतो. खरंतर, परफेक्ट चहा बनवणं ही एक कला आहे. पाणी, दूध, चहा पावडर आणि साखर यांचं योग्य प्रमाण, उकळण्याची वेळ आणि पद्धत - या सगळ्यांचा चवीवर मोठा परिणाम होतो. छोट्या-छोट्या चुका टाळल्या तरच चहा फेसाळता असला तरी चवीलाही तितकाच जबरदस्त लागतो(how to make perfect tea at home).

सकाळचा पहिला चहा जर मनासारखा झाला नाही, तर पूर्ण दिवसच बिघडून गेल्यासारखं वाटू लागतं. अनेकांची तक्रार असते की, चहापावडर उत्तम प्रतीची  वापरतो, दूधही घट्ट असतं, पण तरीही चहा बनवताना कपात फक्त फेसच दिसतो आणि चव मात्र पाणचट असते. तो कडकपणा आणि चहाचा अर्क जिभेवर रेंगाळण्याऐवजी, चहा नुसताच पातळ आणि फेसाळलेला लागतो. तुमच्याही चहाबाबत असं घडत असेल, तर समजून जा की तुम्ही चहा बनवताना एक अतिशय छोटी पण महत्त्वाची चूक करत आहात. चहा बनवताना (how to make strong and tasty chai) कोणत्या चुका टाळाव्यात आणि चहा (perfect chai recipe tips) अधिक चविष्ट बनवण्यासाठी कोणत्या खास टिप्स उपयोगी पडतात, हे पाहूयात. 

चहामध्ये फेस येण्यामागचे नेमके कारण काय?

चहामध्ये फेस येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दूध मंद आचेवर न उकळवता, मोठ्या आचेवर उकळणे. जेव्हा दूध जास्त गरम होते, तेव्हा त्यामध्ये असलेले प्रोटिन आणि फॅट वरच्या बाजूला जमा होतात आणि फेस तयार करतात. जर चहामध्ये चहा पावडर जास्त प्रमाणात टाकली किंवा ती खूप वेळ उकळत ठेवली, तरीही चहा फेसाळतो. अनेकदा कमी दर्जाच्या किंवा खराब झालेल्या दुधामुळेही चहावर मोठ्या प्रमाणात फेस येतो.

इडली-डोशाच्या पिठावर 'वि़ड्याचे पान' ठेवा आणि कमाल पहा! इडल्या मऊलुसलुशीत तर डोसा होईल कुरकुरीत... 

उंदीर-झुरळं-पाली-मुंग्या पळतील घराबाहेर-पाहा धूप आणि कापराचा सोपा उपाय-करा कायमचा बंदोबस्त...

चहा करताना या चुका टाळा... 

१. सर्व साहित्य एकत्र टाकणे :- अनेकजण पाणी, दूध आणि चहा पावडर सर्व एकत्र टाकून चहा उकळतात. ही पद्धत सोपी वाटत असली तरी, यामुळे चहावर फेस जास्त येतो आणि चहाचा खरा फ्लेवर उतरत नाही. चहा बनवण्याची योग्य पद्धत म्हणजे - आधी पाण्यात चहा पावडर, आले-वेलची व्यवस्थित उकळून घ्या आणि त्यानंतरच दूध टाका.

२. गॅसच्या फ्लेमचे संतुलन आहे गरजेचे :- मोठ्या आचेवर चहा बनवल्यास तो लवकर तयार होतो, पण चवीला कडवट लागू शकतो. चहा नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर बनवला पाहिजे. यामुळे चहा व्यवस्थित शिजतो आणि अतिरिक्त फेस येण्याची शक्यताही कमी होते.

३. साहित्याचे योग्य प्रमाण ठेवा :- एक उत्तम चहा बनवण्यासाठी साहित्याचे प्रमाण अचूक असणे खूप महत्त्वाचे आहे. जास्त दूध, जास्त चहा पावडर किंवा जास्त साखर चहाची चव बिघडवू शकते. संतुलित प्रमाणात बनवलेला चहा अधिक चविष्ट लागतो.

१० मिनिटांत करा कांद्याची झणझणीत सुकी चटणी! भाजीला पर्याय आणि साध्या जेवणालाही रंगत आणणारा गावरान पदार्थ... 

परफेक्ट चहासाठी सोप्या टिप्स... 

१. चहा उकळत असताना मध्ये - मध्ये चमच्याने हलवत राहा.

२. चहा व्यवस्थित उकळल्यानंतर तो जास्त वेळ गॅसवर ठेवू नका.

३. नेहमी ताजे दूध आणि चांगल्या दर्जाच्या चहा पावडरचा वापर करा.

या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही प्रत्येक वेळी उत्कृष्ट चहा बनवू शकता.

Web Title : हर बार झागदार, स्वादिष्ट चाय के लिए इन गलतियों से बचें!

Web Summary : क्या आप झागदार, बेस्वाद चाय से परेशान हैं? ज़्यादा गरम दूध, एक साथ सभी सामग्री डालना और गलत अनुपात आम कारण हैं। मध्यम आंच पर चाय उबालें, चाय पत्ती डालने के बाद दूध डालें, और एक सही कप के लिए ताज़ी सामग्री का उपयोग करें।

Web Title : Avoid these mistakes for foamy, flavorful tea every time!

Web Summary : Tired of foamy, tasteless tea? Overheating milk, adding all ingredients at once, and incorrect ingredient ratios are common culprits. Simmer tea on medium heat, add milk after the tea leaves have steeped, and use fresh ingredients for a perfect cup.