Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळं पडतं- पोळ्या कडक होतात? पिठात घाला १ गोष्ट- २ दिवसही पोळ्या राहतील मऊ

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळं पडतं- पोळ्या कडक होतात? पिठात घाला १ गोष्ट- २ दिवसही पोळ्या राहतील मऊ

Why does dough turn dark in the refrigerator: Secret ingredient for soft chapatis: पोळ्या अगदी नुकत्याच मळलेल्या पिठासारख्या पांढऱ्याशुभ्र आणि कापसासारख्या मऊ-लुसलुशीत होतात. पीठ मळताना त्यात काय घालायला हवं पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2026 13:05 IST2026-04-21T13:04:47+5:302026-04-21T13:05:31+5:30

Why does dough turn dark in the refrigerator: Secret ingredient for soft chapatis: पोळ्या अगदी नुकत्याच मळलेल्या पिठासारख्या पांढऱ्याशुभ्र आणि कापसासारख्या मऊ-लुसलुशीत होतात. पीठ मळताना त्यात काय घालायला हवं पाहूया.

How to prevent atta from turning black in fridge Tips to keep dough fresh for 2 days How to make soft chapati from refrigerated dough Storing wheat flour dough in fridge hacks | फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळं पडतं- पोळ्या कडक होतात? पिठात घाला १ गोष्ट- २ दिवसही पोळ्या राहतील मऊ

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळं पडतं- पोळ्या कडक होतात? पिठात घाला १ गोष्ट- २ दिवसही पोळ्या राहतील मऊ

सध्याच्या धावपळीच्या जगात वेळेची बचत करण्यासाठी अनेक गृहिणी सकाळीच किंवा अदल्या रात्रीच कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवतात. पण बऱ्याचदा असं होतं की, फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ काही तासांतच वरुन काळं पडू लागतं.(How to prevent atta from turning black) इतकंच नाही तर या पिठाच्या पोळ्या केल्यावर त्या हव्या तशा पांढऱ्या दिसत नाहीत आणि थोड्याच वेळात त्या कडक किंवा वातड होतात.(Best container to store atta in fridge) फ्रिजमधील थंड हवेमुळे पिठातील ओलावा कमी होतो आणि त्याचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्यावर काळे चट्टे दिसू लागतात. अशा कडक आणि काळ्या पोळ्या कुणीही खात नाही. (Kitchen hacks for working women Marathi)
दरवेळी ताजं पीठ मळणं शक्य नसेल तर काय करावं? पीठ मळताना आपण एका खास पदार्थाचा वापर केला आणि पीठ साठवण्याची योग्य पद्धत अवलंबली, तर फ्रिजमधील पीठ २ दिवसानंतरही अगदी ताजं आणि मऊ राहू शकतं. या पिठाच्या पोळ्या अगदी नुकत्याच मळलेल्या पिठासारख्या पांढऱ्याशुभ्र आणि कापसासारख्या मऊ-लुसलुशीत होतात. पीठ मळताना त्यात काय घालायला हवं पाहूया. 

उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!"

पीठ मळताना पाण्यासोबत २ ते ३ चमचे कोमट दूध घाला. दुधामुळे पिठातील ग्लुटेन लवचिक राहण्यास मदत होते आणि पोळ्यांना नैसर्गिक पांढरेपणा मिळतो. दुधामुळे पिठावर काळे चट्टे पडण्याची प्रक्रिया कमी होते. जर आपल्याला दूध वापरायचे नसेल तर पीठ मळताना पाण्याचा हात लावण्याऐवजी थोडे कोमट पाणी आणि १ चमचा तेल घाला. 

पीठ मळताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पीठ अधिक मऊ होतं आणि फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते कडक होत नाही. पीठ मळून झाल्यावर त्याच्या वरच्या थरावर थोडे तेल किंवा तूप लावावे. यामुळे पिठाचा हवेचा संपर्क तुटतो आणि फ्रिजमधील कोरड्या हवेमुळे पीठ काळं पडत नाही. 

पीठ कधीही उघडं ठेवू नका. ते स्टीलच्या किंवा काचेच्या एअरटाईट डब्यातच ठेवा. डब्याचे झाकण घट्ट लावल्यामुळे पिठातील ओलावा टिकून राहतो. डबा नसेल तर पिठाच्या भांड्यावर क्लिंग फिल्म लावून फ्रिजमध्ये ठेवा. 

फ्रिजमधील थंड पीठाच्या पोळ्या लगेच लाटू नका. यामुळेत त्या व्यवस्थित लाटल्या जात नाहीत. जेवण बनवण्याच्या किमान २० ते ३० मिनिटाआधी पीठ फ्रिजबाहेर काढून ठेवा. पीठ सामान्य तापमानावर (Room Temperature) आल्यावर ते पुन्हा एकदा थोडा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून मळून घ्या. यामुळे पोळ्या छान फुगतात.

पीठ मळताना चिमूटभर मीठ आणि थोडे तेल घातल्याने पोळ्यांना छान चव येते आणि त्या दीर्घकाळ मऊ राहतात. पीठ जितकं जास्त मळलं जाईल, तितकी त्यात लवचिकता वाढते. किमान ५-७ मिनिटे पीठ नीट मळून घ्या.

Web Title: How to prevent atta from turning black in fridge Tips to keep dough fresh for 2 days How to make soft chapati from refrigerated dough Storing wheat flour dough in fridge hacks