Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!"

उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!"

Homemade mango pudding without gelatin: Best summer treats for kids: झटपट मँगो पुडिंग कसं बनवायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2026 09:30 IST2026-04-21T09:30:00+5:302026-04-21T09:30:01+5:30

Homemade mango pudding without gelatin: Best summer treats for kids: झटपट मँगो पुडिंग कसं बनवायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

Easy Mango Pudding recipe for kids 15 minute summer dessert recipes How to make mango pudding at home Refreshing mango dessert for summer Mango recipes for children | उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!"

उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!"

उन्हाळा सुरु झाला की मुलांना सु्ट्टी लागते, सतत त्यांची एकच मागणी असते ती म्हणजे काहीतरी थंड आणि गोड खायला हवं. उन्हाच्या कडाक्यामुळे मुलं हैराण होतात आणि सतत आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा हट्ट धरतात.(Easy Mango Pudding recipe for kids) पण रोज बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा घरी बनवलेला पौष्टिक आणि गारेगार पदार्थ दिला तर?. सध्या आंब्याचा मोसम सुरु आहे आणि हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. फक्त १५ मिनिटांत तयार होणारं मँगो पुडिंग आपल्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. (15 minute summer dessert recipes)
हे पुडिंग चवीला जितकं अप्रतिम लागतं, तितकंच ते दिसायलाही खूप आकर्षक असतं. विशेष म्हणजे, हे बनवण्यासाठी तुम्हाला तासनतास किचनमध्ये उभे राहण्याची किंवा खूप महागड्या साहित्याची गरज नाही.(How to make mango pudding at home) घरच्या घरी उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात तुम्ही हे 'रॉयल डेझर्ट' तयार करू शकता. पाहूयात झटपट मँगो पुडिंग कसं बनवायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. (Mango recipes for children)

उन्हाळ्यातील गार पेय! चहाच नाही, तर गोकर्णांच्या फुलांचा घरीच करा रेस्टॉरंट स्टाईल'ब्लू लगून' मॉकटेल - सोपी रेसिपी

साहित्य 

आंबे - २
दूध - दीड कप 
साखर - अर्धा कप 
कॉर्न फ्लोअर - ५ मोठे चमचे
दूध (कॉर्न फ्लोअरसाठी)- ४ मोठे चमचे
लिंबाचा रस- ४ ते ५ थेंब 

कृती 

1. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्या. नंतर पिकलेल्या आंब्याची साल काढून त्याचे तुकडे करुन घ्या. 

2. एका ब्लेंडर किंवा मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे, दीड कप दूध आणि अर्धा कप दूध घालून छान गुळगुळीत पेस्ट तयार करुन घ्या. 

3. आता कढईत तयार केलेली मँगो प्युरी काढा आणि गॅसवर उकळायला ठेवा. लहान वाटीत ५ चमचे कॉर्न फ्लोअर आणि ४ चमचे दूध घाला. त्यात एकही गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. 

4. कढईतील प्युअरीला उकळी आली की, त्यात तयार केलेली कॉर्न फ्लोअरची पेस्ट हळूहळू ओता. हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. जोपर्यंत त्याला दाटपणा येत नाही. 

5. मिश्रण पुरेसं घट्ट झालं की गॅस बंद करा. आता त्यात ४ ते ५ थेंब लिंबाचा रस पिळून व्यवस्थित मिक्स करा.  तयार मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन थोडं कोमट होऊ द्या. 

6. हा बाऊल १ तास फ्रीजमध्ये ठेवा. ज्यामुळे पुडिंग व्यवस्थित सेट होईल. पुडिंग छान थंड आणि सेट झालं की फ्रीजमधून बाहेर काढा आणि गारेगार मँगो पुडिंगचा आनंद घ्या. 

 


Web Title : मैंगो पुडिंग: बच्चों के लिए झटपट और ठंडी मिठाई की रेसिपी

Web Summary : इस 15 मिनट में बनने वाली मैंगो पुडिंग से गर्मी को मात दें! यह आसान रेसिपी आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करके एक स्वादिष्ट और ताज़ा व्यंजन बनाती है जो बच्चों को पसंद आएगी। यह बाजार की मिठाइयों का एक स्वस्थ विकल्प है।

Web Title : Mango Pudding: A quick, cool dessert recipe for kids.

Web Summary : Beat the heat with this 15-minute mango pudding! This simple recipe uses easily available ingredients for a delicious and refreshing treat kids will love. It's a healthy alternative to store-bought sweets.