हल्ली आहाराकडे कित्येकांचं लक्षच नसतं. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी काहीतरी खाणं.... असंच आजची बहुसंख्य तरुणाई करते. याचा व्हायचा तो परिणाम शरीरावर होतो आणि मग कमी वयातच अंगदुखी, पाठदुखी, थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं असे त्रास सुरू होतात. कारण आहारातून पुरेसे पौष्टिक घटक शरीराला मिळतच नाहीत. त्यामुळे मग शरीरात खनिजे, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषण मुल्यांची कमतरता व्हायला लागते. हे टाळण्यासाठी आता एक सोपा आणि चवदार उपाय करून पाहा. एका खास पद्धतीने अगदी १० ते १५ मिनिटांत घरी चिक्की तयार करा. ही चिक्की रोज थोडी खा. यामुळे तुमच्या हाडांमध्ये ताकद येईल आणि कित्येक दुखणी पळून जातील.(simple tips and tricks to make protein rich, iron rich chikki)
पाठ- कंबर- गुडघेदुखी कमी करण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला चिक्की तयार करायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे...
साहित्य
१ वाटी किसलेला गूळ
इनडोअर प्लांट्स सुकून जातात- पानं पिवळी पडतात? ४ टिप्स- राेपं नेहमीच राहतील टवटवीत, हिरवीगार
१ वाटी फुटाणे
पाव वाटी तीळ
पाव वाटी शेंगदाणे
१ टेबलस्पून बडिशेन
१ टेबलस्पून तूप
कृती
चिक्की तयार करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये गूळ घाला आणि तो चांगला वितळवून घ्या.
गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये तूप घाला. तूप आणि गूळ एकत्र झाले की मग फुटाणे, शेंगदाणे, पांढरे तीळ आणि बडिशेप असे सगळे पदार्थ त्यामध्ये घालून परतून घ्या.
उन्हाळ्यात चेहऱ्याला 'या' पद्धतीने लावा आमसुलाचा थंडगार लेप- टॅनिंग, पिगमेंटेशन जाऊन त्वचा उजळेल
साधारणपणे १० मिनिटांतच कढईतल्या मिश्रणाला उकळी येईल आणि तो घट्ट व्हायला लागेल. यानंतर गॅस बंद करा.
एक पसरट ताट घेऊन त्याला तूप लावा आणि त्यावर तयार केलेलं चिक्कीचं मिश्रण घालून पसरवून घ्या. त्याच्या वड्या पाडल्या की चिक्की झाली तयार. ही चिक्की रोज खा आणि मुलांनाही खायला द्या. अतिशय पौष्टिक असते कारण तिच्यातून लोह, प्रोटीन्स, कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळतं.
