Tomato Storage Tricks : टोमॅटो हे एक असं फळ आहे जे भारतीय घरांमध्ये प्रत्येक भाजीत, डाळीत किंवा सलादमध्ये वापरलं जातं. काही भाज्या किंवा पदार्थ तर असे असतात ज्या टोमॅटोशिवाय बनवताच येत नाहीत. पण आपण पाहिलं असेल की, उन्हाळ्यात टोमॅटो जास्त तापमानामुळे लवकर बेकार होतात. एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त टोमॅटो टिकत नाहीत. फ्रिजमध्ये ठेवूनही टोमॅटो खराब होतात. अशात बरेच लोक घरात जास्त टोमॅटो स्टोर करण्यापेक्षा दर एक ते दोन दिवसाआड बाजारातून विकत आणतात. जर आपल्याला सतत बाजारात जाणं टाळायचं असेल तर टोमॅटो स्टोर करण्याच्या काही ट्रिक्स ट्राय करू शकता. ज्यांच्या मदतीने टोमॅटो जास्त दिवस फ्रेश राहतील.
फ्रिजमध्ये टोमॅटो का सडतात?
टोमॅटो फ्रिजमध्ये लवकर खराब होतात कारण अतिथंड तापमानामुळे त्यांच्या नैसर्गिक पेशींचं नुकसान होतं. १०°C पेक्षा कमी तापमानात टोमॅटोची चव, टेक्स्चर आणि ताजेपणा कमी होतो. उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान खूप कमी असल्याने टोमॅटोची बाहेरील साल मऊ पडू लागते आणि बुरशी तसेच बॅक्टेरियांची वाढ वेगाने होते. टोमॅटो पिलपिले होतात, फुटतात.
टोमॅटो स्टोअर करण्याची योग्य पद्धत
योग्य पद्धतीने स्टोअर केल्यास पिकलेले टोमॅटो अनेक आठवडे फ्रेश राहू शकतात. यासाठी फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी काही सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात.
पहिली ट्रिक
आधी टोमॅटो स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करा.
एका कंटेनरमध्ये टिश्यू पेपरची एक लेयर अंथरा.
त्यावर टोमॅटो उलटे ठेवा, म्हणजे देठाचा भाग खाली येईल.
वरून पुन्हा टिश्यू पेपर ठेवा.
कंटेनरचे झाकण बंद करून फ्रिजमध्ये ठेवा.
दुसरी टोमॅटो स्टोरेज ट्रिक
टोमॅटो स्वच्छ धुतल्यानंतर त्यांच्या देठाच्या भागावर थोडेसे तेल लावा.
सर्व टोमॅटो एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा.
हा कंटेनर फ्रिजच्या वरच्या शेल्फवर ठेवा.
काय करू नये?
उन्हाळ्यात टोमॅटो रूम टेम्परेचरमध्ये १-२ दिवसांपेक्षा जास्त ताजे राहत नाहीत. त्यामुळे त्यांना किचन काउंटरवर जास्त वेळ ठेवणे टाळा. तसेच, टोमॅटो फ्रिजमध्ये उघडे ठेवू नका. जर तुम्हाला ते जास्त काळ फ्रेश ठेवायचे असतील, तर नेहमी कंटेनरमध्ये किंवा झाकूनच स्टोअर करा.
