Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ताटात रोज पौष्टिक पदार्थ तरी तब्येतीचा वाजलाय बोऱ्या, कारण तुमच्या ३ चुका! जेवून हात धुताच होते गडबड

ताटात रोज पौष्टिक पदार्थ तरी तब्येतीचा वाजलाय बोऱ्या, कारण तुमच्या ३ चुका! जेवून हात धुताच होते गडबड

Avoid doing these things after dinner and lunch , health care tips : जेवणानंतर टाळा या गोष्टी. पाहा काय परिणाम होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 16:51 IST2026-05-12T16:49:41+5:302026-05-12T16:51:29+5:30

Avoid doing these things after dinner and lunch , health care tips : जेवणानंतर टाळा या गोष्टी. पाहा काय परिणाम होतो.

Avoid doing these things after dinner and lunch , health care tips | ताटात रोज पौष्टिक पदार्थ तरी तब्येतीचा वाजलाय बोऱ्या, कारण तुमच्या ३ चुका! जेवून हात धुताच होते गडबड

ताटात रोज पौष्टिक पदार्थ तरी तब्येतीचा वाजलाय बोऱ्या, कारण तुमच्या ३ चुका! जेवून हात धुताच होते गडबड

आपण काय खातो या इतकेच महत्त्वाचे असते की जेवल्यानंतर आपण काय करतो. अनेकदा चांगला आणि पौष्टिक आहार घेतल्यानंतरही काही चुकीच्या सवयींमुळे पचन बिघडते, अॅसिडिटी वाढते, पोट फुगल्यासारखे वाटते किंवा शरीर जड होते. विशेषतः दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर काही गोष्टी टाळल्या तर पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होऊ शकते. (Avoid doing these things after dinner and lunch , health care tips )अनेक लोक जेवल्यानंतर लगेच पाणी पितात. मात्र खूप जास्त प्रमाणात पाणी लगेच पिणे टाळावे. त्यामुळे पचनासाठी आवश्यक असलेल्या एन्झाइम्सवर परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर थोड्या वेळाने पाणी पिणे अधिक योग्य मानले जाते.

काहींना जेवल्यावर लगेच झोपण्याची सवय असते, विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर. ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तासांचे अंतर ठेवणे फायदेशीर ठरते. दुपारच्या जेवणानंतर लगेच बसून राहणे किंवा सतत मोबाइल वापरणेही टाळावे. चालणे किंवा थोडी हालचाल केल्यास पचन सुधारण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला जडपणा कमी जाणवतो. मात्र जेवल्यानंतर लगेच जोरदार व्यायाम करणेही योग्य नाही. त्यामुळे पोटावर ताण येऊ शकतो.

जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय अनेकांना असते. पण त्यामुळे शरीरातील काही पोषक घटकांचे शोषण कमी होऊ शकते. विशेषतः लोह शरीरात जिरण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर लगेच चहा-कॉफी टाळणे चांगले. रात्री उशिरा जड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यास पचन मंदावू शकते. त्यामुळे झोप नीट लागत नाही आणि सकाळीही थकवा जाणवू शकतो. रात्री हलके आणि संतुलित जेवण घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. तसेच फळेही जेवणानंतर खाऊ नका. जेवणाच्यावेळी तात्विक आहार पोटभर जेवणच महत्त्वाचं. जेवणानंतर लगेच फळे खाणेही काही वेळा पचनासाठी त्रासदायक ठरु शकते. फळे आणि मुख्य जेवण यामध्ये थोडे अंतर ठेवणे अधिक चांगले मानले जाते.

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त योग्य आहार पुरेसा नसतो, तर जेवणानंतरच्या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. छोट्या छोट्या चुका टाळल्या तर पचन सुधारण्यास मदत होते आणि शरीरही अधिक निरोगी राहू शकते.

Web Title : पौष्टिक भोजन, फिर भी सेहत खराब? भोजन के बाद ये गलतियाँ न करें!

Web Summary : सिर्फ़ अच्छा खाना ही काफ़ी नहीं। भोजन के तुरंत बाद पानी न पिएं, तुरंत न सोएं, और चाय/कॉफ़ी से बचें। बेहतर पाचन और स्वास्थ्य के लिए भोजन, नींद और फल खाने में अंतर रखें।

Web Title : Healthy food, unhealthy habits: Avoid these mistakes after meals!

Web Summary : Good food alone isn't enough. Avoid drinking water immediately after meals, sleeping right away, or consuming tea/coffee. Maintain a gap between meals, sleep, and fruit intake for better digestion and health.