Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल

अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल

How to Do Sheetali Pranayama?: उन्हाळ्यात खूपदा अंगातली उष्णता वाढते. हा त्रास टाळण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(benefits of shitali pranayama)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 13:22 IST2026-04-20T13:21:52+5:302026-04-20T13:22:47+5:30

How to Do Sheetali Pranayama?: उन्हाळ्यात खूपदा अंगातली उष्णता वाढते. हा त्रास टाळण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(benefits of shitali pranayama)

how to do sheetali pranayama, benefits of shitali pranayama | अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल

अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल

Highlightsशीतली प्राणायाम नियमितपणे केल्यास मनावरचा ताण कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते.

सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. ऊन वाढलं की अनेकांना उष्णतेचा त्रास होतो. अंगातली उष्णता वाढते. पोटात आग उठल्यासारखं होतं. पित्त, ॲसिडीटी असे त्रास वारंवार होऊ लागतात. तसेच लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे म्हणजेच उन्हाळी लागण्याचाही त्रास होतो. काही जणांच्या तळहाताची, तळपायाची सालं निघू लागतात. उष्णतेमुळे होणारे हे सगळे त्रास टाळायचे असतील तर एक अगदी सोपा उपाय पाहा. हा उपाय म्हणजे शीतली प्राणायाम. शरीर थंड ठेवण्यास मदत करणारं हे प्राणायाम कधी आणि कसं करायचं ते पाहुया..(benefits of shitali pranayama)

 

शीतली प्राणायाम कधी आणि कसं करावं?

शीतली प्राणायाम करण्यास अतिशय सोपं आहे. हे प्राणायाम तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला थोडा वेळ असेल तेव्हा एका जागी शांत बसा.

जीभ बाहेर काढून ती थोडीशी दुमडल्यासारखी करा. आता जिभेला जो थोडा नळीसारखा आकार येईल त्यातून हवा शरीरात घ्या.

यानंतर तोंड बंद करा आणि नाकातून श्वास बाहेर सोडा.  असं साधारण १० वेळा करा. यासाठी तुम्हाला जास्तीतजास्त एक ते दिड मिनिट एवढाच वेळ लागेल. पण अंगातली उष्णता मात्र बरीच कमी होईल. 

 

शीतली प्राणायाम करण्याचे फायदे

शरीरातली आग, उष्णता शांत होण्यास मदत होते.

ज्या लोकांना ॲसिडीटी, पित्त असा त्रास होतो त्या लोकांनीही शितली प्राणायाम रोज करावे. शरीरातले पित्त कमी होते.

आठवड्यातून २ वेळा चेहऱ्याला लावा 'हा' लेप, सुरकुत्या न येता पन्नाशीतही त्वचा राहील टाईट, सुंदर

शीतली प्राणायाम करण्याचे त्वचेलाही खूप फायदे होतात. जर शरीरात उष्णता असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर होतोच. पिंपल्स, ॲक्ने वाढतात. अंगातली उष्णता कमी झाल्याने हे कित्येक त्रास टाळले जातात.

शीतली प्राणायाम नियमितपणे केल्यास मनावरचा ताण कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते.


 

Web Title : सिर्फ एक मिनट में शीतली प्राणायाम से शरीर की गर्मी कम करें।

Web Summary : शरीर की गर्मी से परेशान हैं? शीतली प्राणायाम मदद कर सकता है। यह आसान सांस लेने की तकनीक शरीर को ठंडा करती है, एसिडिटी को कम करती है और त्वचा को लाभ पहुंचाती है। गर्मी से होने वाली परेशानी से राहत पाने और मन को शांत करने के लिए कभी भी, कहीं भी एक मिनट के लिए इसका अभ्यास करें।

Web Title : Reduce body heat with this one-minute Sheetali Pranayama.

Web Summary : Suffering from body heat? Sheetali Pranayama can help. This simple breathing technique cools the body, reduces acidity, and benefits the skin. Practice it anytime, anywhere for just a minute to relieve heat-related discomfort and calm the mind.