क्रीडा विश्वात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारताचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरणारी 'सुपरमॉम' मेरी कोम हिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. वजन कमी करण्यासाठी तिनं नेमकं काय केलं असा प्रश्न अनेकांना पडतो.२०१८ मधील पोलंडमधील एका स्पर्धेदरम्यान मेरी कोमने अवघ्या ४ तासांत चक्क २ किलो वजन कमी करून सर्वांनाच थक्क केले होते. (How Mary Kom Lost 2kg in Just 4 HoursThe Secret Weight Loss Formula of India’s Boxing Queen)
काय घडलं होतं नेमकं?
२०१८ मध्ये पोलंडमध्ये झालेल्या 'सिलेशियन ओपन बॉक्सिंग' स्पर्धेत मेरी कोमला ४८ किलो वजनी गटात सहभागी व्हायचे होते. मात्र, ऐन स्पर्धेच्या वजन काट्यावेळी तिचे वजन ५० किलो भरले. म्हणजेच वजनी गटात बसण्यासाठी तिला २ किलो वजन तातडीने कमी करणे आवश्यक होते. जर तिने वजन कमी केले नसते, तर तिला स्पर्धेतून बाद व्हावे लागले असते. अशा वेळी मेरी कोमने हार न मानता एका विशेष व्यायामाचा आधार घेतला.
मेरी कोमचा 'वेट लॉस फॉर्म्युला'
मेरी कोमने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, वजन कमी करण्यासाठी तिने एक तास सलग 'स्किपिंग' (दोरीच्या उड्या) केल्या. चार तासांच्या अवधीत तिने कठोर व्यायाम आणि स्किपिंगच्या माध्यमातून शरीरातील अतिरिक्त पाणी आणि घाम बाहेर काढला. यामुळे तिचे वजन ४८ किलोपर्यंत खाली आले आणि तिने केवळ स्पर्धेतच भागच घेतला नाही, तर सुवर्णपदकही जिंकले.
दोरीच्या उड्यांचे फायदे (Benefits of Skipping):
मेरी कोमच्या मते, जलद वजन कमी करण्यासाठी 'दोरीच्या उड्या' हा सर्वात प्रभावी कार्डिओ व्यायाम आहे.
कॅलरी बर्न
१५ मिनिटे दोरीच्या उड्या मारल्यास साधारण ३०० कॅलरीज बर्न होतात. यामुळे पाय, हात आणि पोटाचे स्नायू बळकट होतात.हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम असल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते. टॉक्सिन्स बाहेर पडतात. भरपूर घाम आल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
फिटनेससाठी इतर टिप्स
मेरी कोमने तिच्या फिटनेसचे रहस्य सांगताना नमूद केले की, ती दररोज १५ किलोमीटर धावते. सोबतच योग्य आहार, पुरेशी झोप आणि सातत्य हे तिच्या फिटनेसचे मुख्य आधारस्तंभ आहेत. ती दिवसाची सुरुवात साध्या नाश्त्याने करते आणि आहारात पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करते.
