मंदिरा बेदी (Mandira bedi) ५४ वर्षांची असूनही तिचा फिटनेस कमालीचा आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मंदीराचा फिटनेस हे दाखवतो की वय हा फक्त नंबर आहे. इंस्टाग्रामवर तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिच्या फिटनेसचा प्रवास दिसून येत आहे. फिट, टोन्ड शरीरासाठी ती नेहमी चर्चेचा विषय ठरते.
तिनं गो-टू शोल्डर वर्कआऊटचे सिक्रेट लोकांसोबत शेअर केले आहे. सर्व सामान्य लोकही हे फिटनेस रूटीन फॉलो करून एक्टिव्ह राहू शकतात आणि आपली शरीरयष्टी निरोगी ठेवू शकतात. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही मंदिरा ही फिट दिसून येते. मंदिराच्या फिटनेसं सिक्रेट काय ते पाहूया. (Actress Mandira Bedi Shoulder Workout Fitness Routine At Age Of 54)
मंदिरा बेदी वयाच्या पन्नाशीतही फिट राहण्यासाठी व्यायाम, रूटीनवर फोकस करते. तिनं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये हे दिसून येतंय की ती व्यायाम करत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय की, मी पर्सनल ट्रेनर नाही. मी फक्त वेट ट्रेनिंग करते.
तिच्या म्हणण्यांनुसार फिट राहण्यासाठी प्रोफेशनल असणं गरजेचं नाही. आपलं शरीर समजून घेऊ स्वत:ला आव्हानं देणं आणि फिटनेसच्या प्रवासाचा आनंद घेणं महत्वाचं असतं. खासकरून पन्नाशीनंतर जेव्हा तुम्हाला एक्टिव्ह आणि हेल्दी राहणं गरजेचं असतं.
मंदिरा आपल्या व्यायामाच्या रुटीनमध्ये अनेक फिजिकल एक्टिव्हीटीज करते. तिनं नवीन पोस्टमध्ये डंबलच्या मदतीनं खांद्यांचा एक व्यायाम केला आहे. हा व्यायाम डंबल ओव्हरहेड प्रेस आहे ज्यामुळे स्ट्रेंथ आणि स्टेबिलिटी वाढते. याव्यतिरिक्त लेटरल रेज आणि फ्रंट रेज हे व्यायामसुद्धा खांदे आणि साईड फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या व्यायामाच्या माध्यमातून मसल्सवर काम केले जाते आणि शरीर निरोगी राहतं.
मंदिरानं शोल्डरचा हा व्यायाम करताना हुला-हुपिंगसुद्धा केले आहे. यामाध्यमातून कोअर मसल्स एक्टिव्ह राहण्यास मदत होते. हॉर्ट रेट वाढतो. मंदिराचे फिटनेस रुटीन एंड्योरेंस आणि हाय इंटेंसिटी ट्रेनिंगचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. या प्रकारचा वर्क आऊट लीन मसल्स आणि एंड्योरेंस वाढवण्यास मदत करतो.
