Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > ऊन आणि घामामुळे त्वचा खूप चिपचिपी-तेलकट दिसते? २ घरगुती फेसपॅक लावा, त्वचेवर येईल ग्लो

ऊन आणि घामामुळे त्वचा खूप चिपचिपी-तेलकट दिसते? २ घरगुती फेसपॅक लावा, त्वचेवर येईल ग्लो

Summer Special Face Pack for Oily Skin: उन्हाळ्यात ऑईली त्वचा खूपच चिपचिपित दिसू लागते. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.. त्वचेमध्ये छान बदल दिसून येईल.(how to take care of oily skin in summer season?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2026 17:11 IST2026-04-25T16:57:30+5:302026-04-25T17:11:32+5:30

Summer Special Face Pack for Oily Skin: उन्हाळ्यात ऑईली त्वचा खूपच चिपचिपित दिसू लागते. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.. त्वचेमध्ये छान बदल दिसून येईल.(how to take care of oily skin in summer season?)

summer special home made face pack for oily skin, how to take care of oily skin in summer season | ऊन आणि घामामुळे त्वचा खूप चिपचिपी-तेलकट दिसते? २ घरगुती फेसपॅक लावा, त्वचेवर येईल ग्लो

ऊन आणि घामामुळे त्वचा खूप चिपचिपी-तेलकट दिसते? २ घरगुती फेसपॅक लावा, त्वचेवर येईल ग्लो

Highlights पुढे सांगितलेले २ घरगुती फेसपॅक ट्राय करून पाहा. त्वचा फ्रेश दिसू लागेल.

उन्हाळा म्हटलं की त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. ज्यांना कामानिमित्त उन्हाळ्यात रोजच घराबाहेर पडावं लागतं, त्यांची त्वचा या दिवसांत खूप टॅन होते. शिवाय ज्यांची त्वचा ऑईली असते त्यांना तर ऊन, घाम यामुळे जरा जास्तच त्रास होतो. त्वचा खूपच तेलकट दिसू लागते. त्वचा तेलकट झाली की आपोआपच मग पिंपल्सचा त्रासही वाढतो. शिवाय तेलकट, चिपचिपित त्वचा अजिबातच फ्रेश दिसत नाही (Summer Special Face Pack for Oily Skin). त्वचेच्या या सगळ्या समस्या कमी करायच्या असतील आणि घामामुळे त्वचा आणखीनच तेलकट होऊ नये असं वाटत असेल तर पुढे सांगितलेले २ घरगुती फेसपॅक ट्राय करून पाहा. त्वचा फ्रेश दिसू लागेल.(how to take care of oily skin in summer season?)

 

उन्हाळ्यात ऑईल स्किनसाठी घरगुती फेसपॅक

१. ऑईली त्वचेसाठी सगळ्यात उत्कृष्ट फेसपॅक म्हणजे मुलतानी मातीचा. यासाठी १ चमचा मुलतानी माती एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये गरजेनुसार गुलाबपाणी घालून त्याची पेस्ट तयार करा.

खरबुजाच्या बियांचं थंडगार सरबत एकदा प्या, चुकून कधी तुम्ही बिया फेकणार नाही! पाहा झटपट गारेगार रेसिपी

यात तुम्ही कोरफडीचा ताजा गरही घालू शकता. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेचा तेलकटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता.

 

२. कडुलिंबाची काही कोवळी पानं घ्या. ती स्वच्छ धुवा आणि मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट गाळून घ्या. आता कडुलिंबाच्या रसामध्ये चिमूटभर हळद आणि थोडं बेसन घाला.

ज्वारीच्या भाकरीला द्या ‘मसाला रोटी’चं रुप, पोळीसारखी मऊमऊ-मुलंही फस्त करतील ४ रोट्या आवडीने

हा लेप चेहऱ्याला लावा आणि ८ ते १० मिनिटांनी हलक्या हाताने मालिश करून लेप काढून टाका. यानंतर चेहरा धुवून माॅईश्चराईज करा. चेहरा छान चमकदार दिसेल. हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता.
 

Web Title : गर्मी में तैलीय त्वचा? ये 2 घरेलू फेस पैक आजमाएं!

Web Summary : गर्मी में तैलीय त्वचा और मुंहासों से परेशान हैं? मुल्तानी मिट्टी या नीम से बने दो घरेलू फेस पैक मदद कर सकते हैं। वे तैलीयपन को कम करते हैं और त्वचा को ताज़ा करते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए साप्ताहिक उपयोग करें।

Web Title : Oily skin in summer? Try these 2 homemade face packs!

Web Summary : Summer heat causing oily skin and breakouts? Two homemade face packs using Multani mitti or neem can help. They reduce oiliness and refresh skin. Use weekly for best results.