Laali Ki Shaadi Mein Laddoo Deewana review : पुन्हा एक रटाळ चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 06:55 AM2017-02-28T06:55:15+5:302017-04-07T18:12:55+5:30

अभिनेत्री अक्षरा हासन, विवान शाह आणि गुरमीत चौधरी स्टारस ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा विनोदी असला तरी एका सिनेमातून एक गंभीर संदेश देण्यात आला आहे.

Laali Ki Shaadi Mein Laddoo Deewana review : पुन्हा एक रटाळ चित्रपट | Laali Ki Shaadi Mein Laddoo Deewana review : पुन्हा एक रटाळ चित्रपट

Laali Ki Shaadi Mein Laddoo Deewana review : पुन्हा एक रटाळ चित्रपट

googlenewsNext
Release Date: April 07,2017Language: हिंदी
Cast: अक्षरा हासन, विवान शाह , गुरमीत चौधरी
Producer: टी.पी.अग्रवाल , राहुल अग्रवालDirector: मनीष हरिशंकर
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>-जान्हवी सामंत

कधीकधी चित्रपट कसा आहे, हे सांगणेच कठीण होऊन बसते़ ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’बद्दलही असेच म्हणता येईल. याची पटकथा इतकी रटाळ आणि अतार्किक आहे, की हा संपूर्ण चित्रपट म्हणजे वेळेचा अपव्यय असेच म्हणता येईल. म्हणायला चित्रपटाचा भाग अतिशय संवेदनशील आणि विनोदी आहेत. पण एकूण चित्रपटाचे म्हणाल तर हा एक अतिशय कंटाळवाण्या चित्रपटाच्या यादीत मोडणारा आहे.

 लाली (अक्षरा हासन)आणि लड्डू (विवान शहा) नावाच्या प्रेमी युगुलाभोवती फिरणारी ही कथा.  महत्त्वाकांक्षा, भोगवादी टिपिकल मॉर्डन शहरी कपलमध्ये मोडणारेच हे कपल असते. बडोद्यात दोघेही कुटुंबापासून दूर एकटे राहत असतात़ डोळ्यांत मोठ मोठी स्वप्न, मनात आकाश कवेत घेण्याची उर्मी असे हे कपल स्वत:ची नोकरी आणि व्यक्तिगत आयुष्य यात ताळमेळ घालण्याच्या प्रयत्नात असते. पण याच वळणावर लग्नाआधी लाली लड्डूपासून गर्भवती राहते आणि मग त्यांच्या नात्याच्या कसोटीचा क्षण पुढे येऊन ठेवतो. लड्डूला या वयात मुलाची जबाबदारी नको असते. कारण त्याला त्याची स्वप्नं खुणावत असतात. पण लाली या बाळाला जगात आणू इच्छिते़.लड्डू बडोद्यात पुन्हा आपल्या कामात गुंततो. तर लाली बडोदा आणि लड्डूला मागे सोडून पुढे निघते. अर्थात काळासोबत लड्डूला आपली चूक उमगते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. लालीच्या आयुष्यात वीर (गुरमीत चौधरी)ची एन्ट्री झालेली असते. वीर लालीला तिच्या पोटातल्या बाळासकट स्वीकारायला तयार असतो. मग एकापाठोपाठ एक असे ट्विस्ट येतात आणि शेवटी कुठल्याही टिपिकल हिंदी चित्रपटाप्रमाणे कथेचा शेवट होतो.

चित्रपटातील काही भाग संवेदनशीलपणे मनाचा ठाव घेतात. विवान शहा, सौरभ शुक्ला आणि सौरभ मिश्रा यांच्यातले काही प्रसंग निश्चिपणे उत्कृष्ट आहेत. पण चित्रपटाची पटकथा अतिशय दुबळी वाटते़. अक्षरा व विवान या दोघांनी त्यांच्यातील संपूर्ण ऊर्जा आपआपल्या भूमिकेत ओतली आहे. गुरमीत चौधरीही अधिक परिपक्त अभिनय केला आहे. पण तरिही हा चित्रपट कंटाळा आणतो आणि सो-सो चित्रपटांच्या यादीत बसतो.

 


 

Web Title: Laali Ki Shaadi Mein Laddoo Deewana review : पुन्हा एक रटाळ चित्रपट

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.