एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 09:13 IST2024-05-04T09:13:05+5:302024-05-04T09:13:52+5:30
लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच आहे.

एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
पुणे : भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश हाेणार आहे. खडसे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोध नाही, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. तावडे म्हणाले, की उद्धवसेनेने युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली; पण निवडून आल्यानंतर आमच्याशी गद्दारी केली. त्यांना धडा शिकवला आहे. देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत.
तावडे म्हणाले...
लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच आहे.
काँग्रेसची देशात सत्ता असताना राज्यघटनेत ८० वेळा बदल केले आहेत.
भाजप बेरजेचे राजकारण करत आहे. त्यामुळे मनसेला बरोबर घेतले आहे.
४० जागांवर विजय नक्की
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी महायुतीला ४० जागा मिळतील.
आम्ही केवळ मतांसाठी जाहीरनामा काढत नाही. आमच्याकडे व्हिजन आहे, असे तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.