निवडणूक आली की लोकं सुटीवर; आधी मतदान करा, मगच राजकारणावर बोला - कपिल देव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 13:59 IST2024-04-17T10:43:33+5:302024-04-17T13:59:22+5:30
जबाबदार राजकारण्यांनी हा देश चालवावा असे प्रत्येकाला वाटत असेल तर मतदानाच्या या उत्सवात सहभाग घेऊन माेठ्या संख्येने मतदान करणे गरजेचे

निवडणूक आली की लोकं सुटीवर; आधी मतदान करा, मगच राजकारणावर बोला - कपिल देव
पुणे : निवडणूक आली की जे लाेक सुटीवर जातात त्यांनी निवडणूक, राजकारण याबाबत काेणतेही ज्ञान पाजळू नये. आधी मतदान करा, मगच राजकारणावर बाेला. जे मतदान करत नाहीत त्यांना राजकारणाविषयी काही एक बाेलण्याचा अधिकार नाही. सर्वांनी मतदान करावे, असे मत ज्येष्ठ व प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांनी व्यक्त केले.
पुण्यातील एका हाॅस्पिटलच्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. याप्रसंगी आर्थाेपेडिक डाॅ. सिनुकुमार भास्करन, रुग्णालयाचे संचालक परमेश्वर दास उपस्थित हाेते.
देव म्हणाले की, चांगल्या व्यक्तींनी राजकारणात आले पाहिजे. जबाबदार राजकारण्यांनी हा देश चालवावा असे प्रत्येक नागरिकाला वाटत असेल तर मतदानाच्या या उत्सवात सर्वांनी सहभाग घेऊन माेठ्या संख्येने मतदान करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. क्रिकेटमधील खेळाडू राजकारणात सहभागी हाेतात याबाबत त्यांना विचा रले असता त्यांनी हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, असे सांगत राजकारणातील लाेकदेखील क्रिकेटमध्ये येऊ शकतात, असा टाेला लगावला. तुम्ही राजकारणात जाणार का? असे विचारले असता ‘प्रत्येक व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात कार्यरत राहावे’ असे स्पष्ट करत काेणत्याही राजकीय पक्षासाेबत जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.