नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 01:41 PM2024-04-16T13:41:14+5:302024-04-16T13:43:22+5:30

लोकसभेत ४०० पारमध्ये आमचा एक आला तर काय फरक पडणार आहे, ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत

There are only announcements when the development of Pune will happen Opposition question, Dhangekar, Mohol, More three on the same platform | नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

पुणे : पुणे शहर देशात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तसेच विद्येचे माहेरघर असल्याने शहराने भारतात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परंतु ट्राफिक, पाणी, कचरा, गुन्हेगारी असे सार्वजनिक प्रश्न अजूनही भेडसावत आहेत. तर या सांस्कृतिक शहराची संस्कृती कुठेतरी कमी होताना दिसते आहे. आपल्याला सगळ्याच बाबतीत विकास करून पुण्याला देशात १ नंबरवर आणायचं आहे. परंतु नुसत्या घोषणा होतायेत पुण्याचा विकास कधी होणार? असा सवाल पुणे लोकसभेच्या विरोधक उमेदवारांनी उपस्थित केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.  

माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशात अनेक योजना आल्या आहेत. त्यांची नावे घेतली तर वेळ कमी पडेल. गेल्या १० वर्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले. ३१ लाख कोटी रक्कम जनतेच्या खात्यात गेली.हा क्रांतिकारक बदल आहे. सर्वसामान्य माणसाचा विचार नेहमीच केला गेला. जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून निर्माण करण्याकडेही जास्त लक्ष दिल गेलं. पुण्यात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली. मला अभिमानाने सांगावस वाटतंय कि मोदींनी मेट्रोचे उदघाटन केलं. हा मोठा बदल आहे. ११०० कोटी खर्च करून वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य नंतरच्या काळात पहिलं वैद्यकीय महाविद्यालय पुण्यात तयार झाल. केंद्र सरकारच्या उपलब्धीमुळे अनेक काम आज पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री योजनेतून हजारो घरे तयार होतायेत, गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेने अनेक योजना समोर आणल्या आहेत. उड्डाणपूल झाले, कर्वे रस्ता पूर्ण झाला, सिंहगड उड्डाणपूल सुरु आहे. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.  पुणे महापालिकेने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कामे केली. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी करण्यासाठी ई बस रस्त्यावर आल्या आहेत. भविष्यात पुण्यातले मार्ग पूर्ण करायचे आहेत, उड्डाणपूल नवीन रस्ते, पूर्ण करण्यावर भर देण्याचा विचार आहे. देशाची निवडणूक आहे. देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय प्रश्न, देशाचे स्थान यावर निवडणूक होणार आहे. आपली अर्थव्यवस्था सर्वोच्च स्थानावर आणायची आहे. शहरातल्या नागरिकांचे प्रश्न, वस्तीतला माणूस, त्यांच्या गरजा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवता येतील. पुण्यात आधी बस कशा आणता येतील हा विचार करू. समाजातल्या प्रत्येक माणसाला मेट्रोचा प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करतोय. बस आणि मेट्रो एकत्रित काम करण्याचं आम्ही विचार करतोय,  


माजी नगरसेवक वसंत मोरे,  वाहतूक कोंडी कामे करणे हे सध्या महत्वाचे वाटते. पुणे महापालिकेने  ३००, ३५० बसेस दिल्या आहेत.  महापालिकेकडे या बसेस लावण्याची व्यवस्था आहे का , बसेस उभारण्यासाठी कुठं पार्किंग करणार आहे, त्यावर तोडगा काढायला पाहिजे. अक्षरश फुटपाथ वर बस उभ्या असतात, पाणी प्रश्न खडकवासला वर अवलंबून आहे. स्वतंत्र धरण होणार आहे का नाही कधी, कात्रजच्या घाटमाथ्यावर ११०० एकर जागा आहे. तलावांची साठवण क्षमता वाढवली तर दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न सुटेल. पुण्यातील एका भागाचा प्रश्न सुटला तर खडकवासला धरणावरवर लोड येणार नाही. अशा प्रकारे इतर भागातले पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. पुणे शहरात ट्राफिक अभियंता का नाहीत, पाण्यासाठी वॉटर अभियंता द्यावा लागेल, कचऱ्यासाठी पण सेपरेट अभियंता पाहिजे. अधिकारी फक्त ठेवले जातात. महापालिकेत त्या त्या विषयांचं ज्ञान असणारे अधिकारी बसवा, हा माझा तो माझा म्हणून कोणालाही बसवू नका. नदी सुधार प्रकल्प २०२२ च्या अगोदर सुरु झालय. त्याचे वास्तव आता समोर यायला लागलाय. नद्यांत स्वच्छ पाणी जायला पाहिजे. मला विकासाचा दिखावा नको. त्याच्या आजूबाजूला गार्डन, झाडे लावण्यापेक्षा नदी स्वच करा. त्या स्वच्छ झाल्या तर प्रकल्प चांगले होतील. पुणे  शहराची सुरक्षेचे नाकेनऊ झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडले जातायेत. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त व्हायला पाहिजे, ससून रुग्णालयात आयसीयू विभागात तरुणाला उंदर कुरतडतात, आरोग्य व्यवस्थेचे धिंडोळे निघाले आहेत. त्याकडे लक्ष द्यायला मला आवडेल. वाचन संस्कृती वाढवायची आहे. पुणे शहारातील स्मारके जपली पाहिजेत. मला लोकसभेत गेल्यावर कोणाच्या मागे बसून बाक वाजवायची नाहीयेत. 

रवींद्र धंगेकर म्हणाले, हे विद्येचे माहेरघर आहे, देशात पुण्याला वेगळे स्थान आहे. ट्राफिक च मोठं संकट आहे. मेट्रोचा डीपीआर काँग्रेसने आणला. नागपूरची मेट्रो पळत आहे. पुण्याची मेट्रो स्टेशन स्टेशन वर उदघाटन होतंय. पुण्यात वाहतुकीची अडचण आहे. महापालिकेचे अनेक प्रकल्प झाले, पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय. निसर्ग अबाधित राहून कामे झाली पाहिजेत. प्रकल्प पुढे जात नाहीत. फक्त पैसे काढले जातायेत. गॅसचे भाव काय झाले, पेट्रोलचे भाव काय झाले, आयुष्यमान योजनेचे काय झालं, पुण्याची गुन्हेगारी, अमली पदार्थ, पाणीपुरवठा याकडे लक्ष द्यद्यला पाहिजे.  नुसत्या घोषणा होत आहेत. काम होत नाहीत. मेट्रोला का उशीर होतोय. का अडचणी येतायेत, विचारांची लढाई विचारानेच होणार आहे. अमली पदार्थ प्रत्येकाच्या उंबऱ्यावर येऊन थांबलाय, घरात घ्यायचं बाकी आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. दूध महाग होत चाललंय. योजनेत खतांचे पैसे दिले जातात. पण ते होत नाही, ४०० पार जाणार असतील त्यामध्ये एक आला तर काय फरक पडणार आहे. ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत.  

Web Title: There are only announcements when the development of Pune will happen Opposition question, Dhangekar, Mohol, More three on the same platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.