चांदणी चौक उड्डाणपूलाचा ढिगारा पूर्णपणे उपसला; वाहतूक सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 12:21 IST2022-10-02T12:21:46+5:302022-10-02T12:21:54+5:30

वाहतूक सुरू झाली तरी महामार्गावरील वाहतूक मात्र मंदच राहणार

The rubble of the Chandni Chowk flyover was completely lifted; Traffic smooth | चांदणी चौक उड्डाणपूलाचा ढिगारा पूर्णपणे उपसला; वाहतूक सुरळीत

चांदणी चौक उड्डाणपूलाचा ढिगारा पूर्णपणे उपसला; वाहतूक सुरळीत

वारजे : चांदणी चौक उड्डाणपूलाचा ढिगारा पूर्ण उपसण्यात प्रशासनाला यश आले असून थोडी साफसफाई व रस्त्याची किरकोळ डागडुजी करून महामार्ग सुरु झाल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांनी दिली आहे. 
    
सकाळी ९ च्या सुमारास मुळशी कडे जाणारी व येणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चांदणी चौकातला जुना उड्डाणपूल रात्री एक वाजता पाडण्यात आला. त्यानंतर लगेच या पुलाचा ढिगारा उपसा कामाला सुरुवात झाली. सहा पोकलेन मशीन व अनेक डंपर लावून दगडमाती लोखंड सळ्या विलग करून दूरवर नेण्यात येत होते. राडारोड्यात निघालेले स्टील देखील एका ठिकाणी रचून ठेवण्यात आली. वाहतूक सुरू झाल्यावर या पुलाच्या परिसरात बघ यांची मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे. वाहतूक सुरू झाली तरी महामार्गावरील वाहतूक मात्र मंदच राहील.

Web Title: The rubble of the Chandni Chowk flyover was completely lifted; Traffic smooth