पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:08 IST2026-01-16T14:06:44+5:302026-01-16T14:08:03+5:30

PMC Result 2026 Rupali Thombre Patil news :

PMC PCMC Result 2026: Machines changed in Pune...! Seals, numbers don't match; Rupali Thombre Patil tries to enter strongroom | पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात

पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीचे निकाल हाती येत असतानाच न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणी प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा दावा करत केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. "लोकशाहीची हत्या झाली आहे," असे म्हणत त्यांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकला आहे.

रूपाली ठोंबरे यांनी आरोप केला आहे की, "मतदानादिवशी वापरलेल्या ईव्हीएम मशीन आणि आज मतमोजणीसाठी आणलेल्या मशीनच्या क्रमांकात तफावत आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक मशीन बदलल्या आहेत." केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांशी त्यांची जोरदार हुज्जत झाली. इतर काही अपक्ष उमेदवारांनीही रूपाली ठोंबरे यांच्या सुरात सूर मिसळत मोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर संतापलेल्या रुपाली यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. 

घोषणाबाजी आणि राडा
केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जादा कुमक बोलवावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान यंत्रांवर (EVM) घेतलेल्या आक्षेपामुळे सुमारे दोन तास मतमोजणी थांबवण्यात आली होती. काही मतदान यंत्रांचे सील आणि क्रमांक यामध्ये तफावत आहे, असा आक्षेप ठोंबरे यांनी घेतला होता.  

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, सर्व मशीन सीलबंद आणि नियमानुसार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, रूपाली ठोंबरे यांनी पुराव्यासह तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. अखेर मतमोजणी पुन्हा सुरू होताच समोर आलेल्या कलांनुसार, प्रभाग २५ मधून भारतीय जनता पक्षाचे (BJP) सर्व उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

Web Title : पुणे चुनाव: ईवीएम में गड़बड़ी के आरोपों से मतगणना रुकी; रूपाली ठोंबरे का विरोध

Web Summary : रूपाली ठोंबरे ने ईवीएम में गड़बड़ी का आरोप लगाकर पुणे में मतगणना रुकवाई। उन्होंने मशीनें बदलने का दावा किया, जिससे विरोध प्रदर्शन हुए और स्ट्रांगरूम में घुसने की कोशिश की गई। बीजेपी उम्मीदवार आगे हैं।

Web Title : Pune Election: EVM Tampering Allegations Halt Counting; Rupali Thombre Protests

Web Summary : Rupali Thombre alleged EVM discrepancies halted Pune's vote counting. She claimed machines were switched, leading to protests and attempts to enter the strongroom. BJP candidates are leading.