PMC Election Results 2026: जिच्या उमेदवारीसाठी भाजपसोबतची युती तोडली...! तिला जिंकता आले नाही...; धंगेकरांच्या पत्नीचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:54 IST2026-01-16T17:53:44+5:302026-01-16T17:54:20+5:30
PMC Election Results 2026 प्रभाग २३ मधून सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर दोघीही राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आहेत

PMC Election Results 2026: जिच्या उमेदवारीसाठी भाजपसोबतची युती तोडली...! तिला जिंकता आले नाही...; धंगेकरांच्या पत्नीचा पराभव
पुणे : पुण्यात मध्यवर्ती भागात चर्चेत असणाऱ्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. कसब्यातील प्रभाग २३ मधून सोनाली आंदेकर तुरुंगातून निवडणूक लढवत प्रतिभा रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. अजित पवारांनी सोनाली आंदेकर यांना तिकीट दिल्याने गुन्हेगारी कुटुंबाला संधी दिल्याची सर्वत्र टीका होऊ लागली होती. त्यामुळे आंदेकर निवडून येणार का? याबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले होते. अखेर सोनाली वनराज आंदेकर या प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यांच्यबरोबर लक्ष्मी आंदेकरही २३ मधून निवडून आल्या आहेत.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
रवींद्र धंगेकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पत्नी आणि मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. प्रभाग २४ मधून प्रणव धंगेकर तर प्रभाग २३ मधून प्रतिभा धंगेकर हे उभे राहिले होते. प्रतिभा धंगेकर यांच्या गटात राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर, आपच्या विजया कद्रे, भाजपच्या अनुराधा मंचे आणि उद्धवसेनेच्या निकीता मारटकर या उमेदवार होत्या. त्यामध्ये धंगेकर विरुद्ध आंदेकर अशी खरी लढत झाली आहे. आणि तुरुंगात असूनही सोनाली आंदेकर यांनी विजय मिळवला आहे. लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या २ जागा पुण्यात वाढल्या आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे.
तुरुंगातूनही जनतेचा विश्वास
तुरुंगात असतानाही आंदेकर भगिनींना मिळालेला जनतेचा कौल हा चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणात जनाधार आणि स्थानिक प्रभाव किती महत्त्वाचा असतो, हे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्रभाग २३ - रविवार पेठ-नाना पेठ
सातवी फेरी (अंतीम निकाल)
अ)
प्रदीप अवचिते (शिंदे गट) ५३५८
अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी) ९१३८
पल्लवी जावळे (भाजप) १४१८३
डॉ.अमोल देवळेकर (काँग्रेस) ९४८८
उमेश बागडे (आप) २७७
नोटा : १७३४
एकूण वैध मतदान ४०९३९
विजयी - पल्लवी जवळे (भाजप)
ब)
सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) १३८१९
विजया कद्रे (आप) ६८०
प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) १०५९०
अनुराधा मंचे (भाजप) १०२९५
निकीता मारटकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४५३२
नोटा : १०२३
विजयी- सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)
क)
लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) १२६४१
निलम करपे (काँग्रेस) ६३५०
डॉ.वैष्णवी किराड (शिंदे गट) ६५९३
ऋतूजा गडाळे (भाजप) १२५००
कल्याणी कोमकर २८२
नोटा : ११०३
विजयी - लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी)
ड)
प्रल्हाद गवळी (मनसे) ४१५८
खान शहाबाज (राष्ट्रवादी) ९४९४
विशाल धनवडे (भाजप) १६०२६
गणेश नलावडे (शिंदे गट) ३२६०
अँड.शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस शप) १८७६
संजय मोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३२२५
नोटा : ८३९
आघाडी - विशाल धनवडे (भाजप)