अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:20 IST2026-01-17T08:18:29+5:302026-01-17T08:20:06+5:30

PMC Election Results 2026, Amol Balwadkar Ward 9 Result news: पुणे महापालिका निवडणूक निकाल: प्रभाग ९ मधून अमोल बालवडकर ९०३ मतांनी विजयी. प्रभाग २५ मध्ये भाजपचे राघवेंद्र मानकर २६,४९७ मतांच्या रेकॉर्डब्रेक आघाडीसह विजयी. वाचा सविस्तर निकाल.

PMC Election Results 2026: How many votes did Amol Balwadkar get? By how many votes did he win...; Along with that, he defeated another NCP candidate... | अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले...  

अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले...  

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या निकालांमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक ९ (बाणेर-बालेवाडी) मध्ये सर्वात चर्चेची ठरलेली 'ड' जागेची लढत अमोल बालवडकर यांनी जिंकली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अमोल बालवडकर यांनी प्रतिस्पधी उमेदवाराचा अवघ्या ९०३ मतांनी पराभव केला.

प्रभाग ९-ड मध्ये अमोल रतन बालवडकर यांना ३५,६०४ मते मिळाली, तर त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार लहू गजानन बालवडकर यांना ३४,७०१ मतांवर समाधान मानावे लागले. याच प्रभागात 'ब' जागेवरून बाबुराव चांदेरे (२८,५४० मते) आणि 'अ' जागेवरून रोहिणी सुधीर चिमटे (४१,९४६ मते) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

भाजपने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत (अजित पवार गट) गेलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे लहू बालवडकर यांच्यावर ५१० मतांची निसटती पण महत्त्वाची आघाडी घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर हे राज्यात सर्वाधिक मतांनी जिंकतील असा दावा केला होता, त्यामुळे अमोल बालवडकरांसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती.

बालवडकर यांच्या प्रभागातील निकाल...

प्रभाग क्रमांक:-9

नववी अंतिम फेरी 


रोहिणी सुधीर चिमटे :- 41946
गायत्री मोहन मेढे ( कोकाटे ) :-32670
नगरघणकर रोशनी बबन :- 2849


गणेश न्यानोबा कळमकर :- 27129
बाबुराव चांदेरे :- 28540 (राष्ट्रवादी विजयी)
संदीप धारू बालवडकर :- 2416
जयेश संजय मुरकुटे :- 7974
प्रमोद नामदेव निम्हण :- 16082
किरण लक्ष्मण रायकर :- 209


मयुरी राहुल कोकाटे :- 34154
ज्योति नितीन चांदेरे :- 7024
पार्वती अजय निम्हण :- 23929
पुनम विशाल विधाते :- 15522


जीवन निवृत्ती चाकनकर :- 3326
सुदर्शन नाशिकराव जगदाळे :- 1122
अमोल रतन बालवडकर :- 35604
लहू गजानन बालवडकर :- 34701
मयूर तुळशीराम भांडे :- 1596
मयूर भगवान सुतार :- 3454
रितेश राहुल निकाळजे :- 246
नितीन विश्वनाथ पायगुडे :- 233
महेश भिमराव सुतार :- 310

Web Title : अमोल बालवडकर पुणे चुनाव में मामूली अंतर से जीते, NCP को फायदा।

Web Summary : अमोल बालवडकर (एनसीपी) ने पुणे के वार्ड 9-डी में 903 वोटों से जीत हासिल की। बीजेपी द्वारा टिकट न दिए जाने के बावजूद, उन्होंने बीजेपी के लहू बालवडकर को हराया। चांदेरे और चिमटे ने भी वार्ड 9 से जीत हासिल की।

Web Title : Amol Balwadkar wins Pune election by narrow margin, NCP gains.

Web Summary : Amol Balwadkar of NCP won Pune's Ward 9-D by 903 votes. Despite BJP denying ticket, he defeated BJP's Lahu Balwadkar. Chandere and Chimte also secured victories from Ward 9.