पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार
By राजू हिंगे | Updated: April 23, 2024 23:00 IST2024-04-23T22:59:24+5:302024-04-23T23:00:16+5:30
एस.पी महाविघालयाच्या मैदाना ऐवजी ही सभा रेसकोर्सवर येथे सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. एस.पी महाविघालयाच्या मैदाना ऐवजी ही सभा रेसकोर्सवर येथे सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडुन बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पुण्यात मुरलीधर माेहोळ, शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या या चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षा आणि चार लोकसभा मतदारसंघासाठी एकच सभा होणार असल्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता ही जाहीर सभा एस पी महाविघालयाच्या मैदाना ऐवजी रेस कोर्स वर सांयकाळी ७ वाजता होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली