...अन्यथा मला आपल्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल; रुपाली पाटलांचा ट्रॉलर्सला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:16 IST2026-01-19T16:16:17+5:302026-01-19T16:16:46+5:30
आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये

...अन्यथा मला आपल्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल; रुपाली पाटलांचा ट्रॉलर्सला इशारा
पुणे : पुण्याच्या प्रभाग क्रमांक २५ आणि २६ मधून राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र दोन्हीकडे मतदारांनी रुपाली पाटील यांना नाकारल्याने त्यांचा पराभव झाला. निकालाच्या दिवशी मतमोजणीवर आक्षेप घेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पुन्हा मतमोजणी घेण्यात आली होती. तरीही निकालात काही बदल झाला नाही. या सर्व घडामोडीनंतर त्यांच्या सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट येत असल्याचे रुपाली यांनी सांगितले आहे. याबाबत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी सोशल मीडियावरून दिला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. सोशल मीडियावर बंधु, भगिनी, वडील मंडळी तसेच पोर्टल, न्यूज चॅनेल यांनी माझ्या बाबतीत जाणीवपूर्वक हेतुपरस्पर फेक नेरेटिव पोस्ट, बदनामीकारक पोस्ट, अश्लील कमेंट कृपया करु नये. वैचारिक मनभेद असतील ,आपण माहिती घेऊन तपासून खात्री करून मगच व्यक्त व्हावे किंवा पोस्ट करावी. आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये. अन्यथा नाहक आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल व गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे की, फेक नेरेटिव पसरवणाऱ्या ट्रॉलर्सला माझ्या बाबतीत कोणतीच चुकीच्या बदनामीच्या पोस्ट करू नये. जाणीवपूर्वक गैरसमज करणाऱ्या पोस्ट करू नये. मी व माझी सोशल टीम परिवार ट्रॉलर्सला जशास तसे उतर देण्यास समर्थ आहोतच. पण त्यासोबत कडक कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यास तत्पर आहे. त्यामुळे ट्रॉलर्स तो कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो संविधानाने, कायद्याने, घटनेने कायदेशीर कारवाईस पात्र राहील. नो फेक नेरेटिव, नो बदनामी पोस्ट, नो अश्लील कमेंट्स,नो अब्रुनुकसान नो समाज भावना दुखावणे. हीच जाहीर नोटीस समजावी असे त्यांनी पोस्ट करून सांगितले आहे.