वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 13:38 IST2023-09-07T13:37:56+5:302023-09-07T13:38:20+5:30
मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती

वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना
दौंड : दौंड येथे आई आणि मुलीच्या भांडणात आईने मुलीला लाथा बुक्क्याने मारून तीचा खून केला असल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत दीक्षा हरिओम जागिंड ( वय १८, राहणार डिफेन्स कॉलीनी, रेल्वे वसाहत दौंड) असे मुलीचे नाव आहे.
सरिता हरीओम जागिंड ( वय ४०) या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील हरिओम जागिंड यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. आई आणि मुलगी यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला आणि त्यातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ओम हरीओम जांगिड हे मूळचे राजस्थानी येथील असून ते रेल्वेच्या नोकरी निमित्ताने दौंड येथे वास्तव्याला आहे. खून झालेली मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. या संदर्भात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत अधिक तपास करत आहे.