Pune Airport | उन्हाळ्यात दुबई, त्रिवेंद्रम, रांचीसह २० शहरांसाठी विमानांची उड्डाणे वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 01:10 PM2022-03-26T13:10:00+5:302022-03-26T13:10:02+5:30

प्रसाद कानडे पुणे : पुणे (लोहगाव) विमानतळाचे (pune international airport) समर शेड्युल रविवार (दि. २७) पासून सुरू होत आहे. ...

in summer flights to 20 cities including dubai trivandrum and ranchi will increase from pune airport | Pune Airport | उन्हाळ्यात दुबई, त्रिवेंद्रम, रांचीसह २० शहरांसाठी विमानांची उड्डाणे वाढणार

Pune Airport | उन्हाळ्यात दुबई, त्रिवेंद्रम, रांचीसह २० शहरांसाठी विमानांची उड्डाणे वाढणार

Next

प्रसाद कानडे

पुणे :पुणे (लोहगाव) विमानतळाचे (pune international airport) समर शेड्युल रविवार (दि. २७) पासून सुरू होत आहे. यात त्रिवेंद्रम, रांची शहरांसाठी नव्याने विमानसेवा सुरू होत आहे, तर सध्या सुरू असलेल्या शहरांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. यात कोलकाता, नागपूर, चेन्नई, अमृतसर या शहरांचा समावेश आहे. शेड्युलमध्ये पहिल्या टप्प्यात विमानांची संख्या ८५ होईल, नंतर मात्र दैनंदिन प्रवासी विमानांची संख्या १०२ इतकी होणार आहे. यात रात्रीच्या वेळी उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या जास्त आहे. याचवेळी पुणे - शारजा विमानसेवा बंद होऊन दुबईसाठी पहिल्यांदा विमान झेपावणार आहे.

पुणे विमानतळावरून सध्या रोज ६५ ते ६८ विमानांची वाहतूक होत आहे. समर शेड्युलमध्ये ही संख्या वाढणार आहे. समर शेड्युलमध्ये ही संख्या जवळपास ८५ इतकी होईल. नव्या शहरांना पुण्याहून विमानसेवा सुरू होत असल्याने पुण्याशी अन्य शहरे जोडली जात आहेत. तसेच ज्या शहरांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे, तिथे विमानांच्या फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. २७ मार्च ते जूनअखेरपर्यंत हे शेड्युल असणार आहे. विमानांची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

शारजा बंद, दुबईसाठी झेपावणार :

विमान सेवेवर निर्बंध असताना एयर बबलअंतर्गत पुणे ते शारजा विमानसेवा सुरू झाली. आता मात्र विमान सेवेवर कोणतेच निर्बंध नाहीत. शिवाय एयर बबलदेखील रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याहून आता शारजासाठी नाही, तर दुबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे. पुण्याहून दुबईसाठी विमान सुरू व्हावे, अशी गेल्या अनेक महिन्यांपासूनची पुणेकरांची मागणी होत आहे. ती आता पूर्ण हाेत आहे. २७ मार्चपासून पुणे - दुबई विमान सेवा सुरू होत आहे.

रन वे व नाईट लँडिंगचा फायदा :

पुणे विमानतळावर काही महिन्यांपूर्वी रन वे व नाईट लँडिंगची कामे पूर्ण करण्यात आली. त्याचा आता फायदा होताना दिसत आहे. पुण्याहून झेपावणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. याच शेड्युलमध्ये दररोज जवळपास १०२ विमानांची उड्डाणे होतील, असे नियोजन विमानतळ प्रशासन व विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांचे आहे.

Web Title: in summer flights to 20 cities including dubai trivandrum and ranchi will increase from pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.