लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:02 AM2024-05-07T10:02:40+5:302024-05-07T10:03:05+5:30

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

Democracy has given the right to vote, everyone should use it says Former minister Harshvardhan Patil | लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

बावडा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४   तिसऱ्या टप्प्यातील  मतदान प्रक्रियेला आज दि. ७ मे रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून  बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील बावडा गावात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील- ठाकरे, मुलगा इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील  यांनी २०० इंदापूर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र क्रमांक ३०८ बावडा येथे मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,आज बारामती लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक दिवस असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  घटना , संविधान लिहिले त्यातून प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून आज आम्ही सर्व कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावला. त्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींना विनंती करतो की, उष्णता जरी असली तापमानात वाढ झाली असली तरी सुद्धा मतदान करण्याचे जे कर्तव्य आहे. ते आपण सर्वांनी पार पाडावे आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी ही इंदापूर तालुक्यामध्ये आणि ज्या ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान चालू आहे. तेथे जास्तीत जास्त मतदान व्हावं आणि लोकशाहीने जे अधिकार दिला आहे. तो मतदानरुपी अधिकारचा उपयोग त्या ठिकाणी  प्रत्येकाने करावा असे आव्हान माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना आवाहन केले.

Web Title: Democracy has given the right to vote, everyone should use it says Former minister Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.