PCMC Municipal Corporation: पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष शनिवारी ठरणार; 'या' नावांची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:28 IST2026-02-24T13:27:57+5:302026-02-24T13:28:43+5:30

अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असून अध्यक्षपद चिंचवडला मिळणार की भोसरीला? महिलांना संधी देणार की पुरुषांना, याबाबत चर्चा रंगली आहे

Pimpri Municipal Corporation Standing Committee Chairman to be elected on Saturday; 'These' names are hotly debated | PCMC Municipal Corporation: पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष शनिवारी ठरणार; 'या' नावांची जोरदार चर्चा

PCMC Municipal Corporation: पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष शनिवारी ठरणार; 'या' नावांची जोरदार चर्चा

पिंपरी : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षाची निवड येत्या शनिवारी (दि. २८) केली जाणार आहे. अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे. अध्यक्षपद चिंचवडला मिळणार की भोसरीला? महिलांना संधी देणार की पुरुषांना, याबाबत चर्चा रंगली आहे. अभिषेक बारणे, दुसऱ्यादा नगरसेवक झालेले बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कस्पटे आणि नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या नावाची चर्चा आहे.

महापालिका निवडणूक झाल्यानंतर पक्षनेता, महापौर विविध विषय समिती निवड आणि आता सभापती निवड होणार आहे. शुक्रवारच्या (दि.२० ) तहकूब सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड केली. त्यात सत्तारूढ भाजपाचे ११ सदस्य आहेत.

भाजपाने नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा ठरविल्यास पहिल्यांदाच महापालिका सभागृहात प्रवेश केलेले शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, सारिका गायकवाड, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, कृष्णा सुरकुले यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तर समिती अध्यक्षपदासाठी अनुभवाचा विचार केल्यास दुसऱ्यांदा स्थायी समितीचे सदस्य झालेले अभिषेक बारणे, दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कस्पटे आणि नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

असा आहे कार्यक्रम

समिती अध्यक्षपदाची निवड येत्या शनिवारी सकाळी अकराला महापालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात होणार आहे. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर असणार आहेत. स्थायी समितीच्या या पहिल्या सभेत अध्यक्षाची निवड होणार आहे, असे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

Web Title : पीसीएमसी स्थायी समिति अध्यक्ष चुनाव शनिवार को; प्रमुख नामों पर चर्चा

Web Summary : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थायी समिति अध्यक्ष का चुनाव शनिवार को है। संभावित उम्मीदवारों को लेकर अटकलें: अभिषेक बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कस्पटे और योगिता नागरगोजे। नए चेहरों को भी मौका मिल सकता है। चुनाव सुबह 11 बजे।

Web Title : PCMC Standing Committee Head Election Saturday; Key Names in Discussion

Web Summary : Pimpri-Chinchwad Municipal Corporation's Standing Committee head election is Saturday. Speculation surrounds potential candidates: Abhishek Barne, Babasaheb Tribhuvan, Sandeep Kaspate, and Yogita Nagargoje. New faces could also get a chance. Election at 11 AM.