Mirzapur Season 3: अभिनेता अली फजलनं सुरू केली 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 03:42 PM2022-05-13T15:42:56+5:302022-05-13T15:42:56+5:30

अभिनेता अली फजलने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनच्या तयारीला सुरूवात केली आहे.

एक्सेल एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित, प्राइम व्हिडिओवरील मिर्झापूर मालिकेची पहिली आवृत्ती २०१८ साली रिलीज झाला होता. २०२० मध्ये रिलीज झालेली दुसरी आवृत्ती भारतातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक होती.

अॅमेझॉन प्राइमच्या मिर्झापूर या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मागील दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता निर्माते 'मिर्झापूर ३' रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, या मालिकेतील गुड्डू पंडितने चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित केली आहे.

गुड्डू पंडितच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अली फजल याने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करून त्याने 'मिर्झापूर'बद्दल असं काही लिहिलं आहे, जे वाचून प्रेक्षकही उत्साही झाले आहेत.

समोर आलेल्या फोटोत गुड्डू पंडितची दमदार शैली पाहायला मिळत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत अली फजल हातात बंदूक घेऊन बसलेला उत्कट भाव कॅमेऱ्यात पाहत आहे. हे शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आणि सुरुवात झाली आहे. तयारी, तालीम, वाचन... लाठी लक्कड़ नहीं, अब नीचे से जूते और ऊपर से बंदूकें फायर होंगी. लगाओ हाथ कमाओ कंताप, गुड्डू आ रहे हैं... अपने आप'.