आतून असे दिसते ‘ये है मोहब्बतें’ फेम दिव्यांका त्रिपाठीचे स्वप्नातील घर, पाहा इनसाइड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:18 PM2020-07-02T12:18:10+5:302020-07-02T12:24:26+5:30

‘ये है मोहब्बतें’ फेम दिव्यांका त्रिपाठीने टीव्ही इंडस्ट्रीत आपले चांगले प्रस्थ निर्माण केले आहे. 2016 मध्ये दिव्यांकाने अभिनेता विवेक दहियासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही मुंबईत एक 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला. आज पाहुया तिच्या सुंदर घराचे फोटो

लग्नानंतर दिव्यांकाने मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने गोरेगावमध्ये सुमारे 1260 स्क्वेअर फूटचे घर खरेदी केले.

दिव्यांकाचे घर गोल्डन रंगाने सजवलेले आहे. घरातील फर्निचरही लक्झरी फिलिंग देते

घरातील भिंतीवरचे वॉलपेपरनी तिच्या घराला आणखीच सुंदर बनवले आहे.

घराचे सीलिंगही सुंदर आहे. घरात पूर्णवेळ प्रकाश राहील, याची व्यवस्था करण्यात आली आहे.

घराच्या एका कोप-यात सुंदर मंदिर आहे. यात सिल्व्हर नक्षीकाम केलेले आहे. याठिकाणी दिव्यांका मेडिटेशनही करते.

या मॉडर्न घराचे इंटिरिअर कमालीचे सुंदर आहे. ट्राफी ठेवण्यासाठी एक खास जागा बनवली गेली आहे.

फर्निचर घरातील रंगाला मॅच होईल, याची पूरेपूर काळजी घेण्यात आलीय.

दिव्यांका व विवेकचा लिव्हिंग एरियातील ही जागा सुंदर पद्धतीने सजवण्यात आलीय.

विवेक व दिव्यांकाचे हे स्वप्नातील घर आहे. या सुंदर घरात दोघांनाही क्वालिटी टाईम घालवायला आवडते.

Read in English