‘Bigg Boss 15’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा राजीव अदातिया कोण आहे? बड्या स्टार्ससोबत आहे ऊठबस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 01:08 PM2021-10-24T13:08:14+5:302021-10-24T13:18:55+5:30

Bigg Boss 15, Rajiv Adatia : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 15’मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झालीये. वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आज रविवारी एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात जातोय. त्याचं नाव राजीव अदातिया.

टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 15’मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झालीये. वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आज रविवारी एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात जातोय. त्याचं नाव राजीव अदातिया.

हा राजीव अदातिया कोण तर बॉलिवूडच्या बड्या बड्या सेलिब्रिटींसोबत ऊठूबस असलेला लोकप्रिय चेहरा. शिवाय शिल्पा शेट्टी व शमिता शेट्टी यांचा मानलेला भाऊ.

राजीव हा वयाच्या 18 व्या वर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे. टीव्ही असो वा बॉलिवूड बडे बडे सेलिब्रिटी त्याला ओळखतात.

राजीवने आर्ट्समध्ये डिग्री घेतलीये. सायकॉलॉजीमध्ये त्याचं स्पेशलाइजेशन आहे. राजीव आहे बिझनेसमॅन आहे. प्रोड्यूसर आणि मोटिवेशनल स्पीकर अशीही त्याची ओळख आहे.

राजीव हा शेट्टी सिस्टर्सच्या खूप जवळ आहे. शमिता व शिल्पा दोघीही राजीवला राखी बांधतात. त्यामुळे बिग बॉसच्या घरात राजीवची एन्ट्री शमिताला मोठा आधार ठरणार आहे.

सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेला राजीव बॉलिवूड इंडस्ट्रीच्या जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारला ओळखतो. लता मंगेशकर, करण जोहर, दीपिका पादुकोण, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, सोनू निगम अशा अनेकांची त्याची चांगली मैत्री आहे.

18 व्या वर्षी राजीवने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. यादरम्यान त्याच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर शिक्षण पूर्ण करून राजीवने बिझनेस सुरू केला.

या एका डेकोर कंपनीचा तो एक भाग आहे. याशिवाय राजीवने एक इव्हेंट कंपनीही सुरू केली. ही कंपनी अनेक बॉलिवूड व हॉलिवूड स्टार्ससोबत काम करते.

Read in English