आम्ही दिसतोच लय भारी, फोटो बघून तुम्हीही म्हणाल ही 'सुंदरा मनामध्ये भरली'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:24 PM2021-01-23T12:24:38+5:302021-01-23T12:33:39+5:30

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.

सोशल मीडियावर अक्षया नाईक नेहमीच अॅक्टिव्ह असते.

ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

अल्पावधीतच तिने रसिकांची पसंती मिळवली आहे.

ऑनस्क्रीन लूकप्रमाणे तिच्या ऑफस्क्रीन लूकलाही चांगली पसंती मिळत आहे.

तिच्या सोशल मीडिया पेजवर नजर टाकली तर तुम्हाला तिच्या विविध अदा पाहायला मिळतील.

कधी वेस्टर्न तर कधी ट्रे़डिशनल अंदाजातील मोहक फोटो पाहायला मिळतील.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.