IN PICS: वयाची चाळीशी ओलांडूनही श्वेता तिवारी तरूणींनाही लाजवेल इतकी दिसते ग्लॅमरस, फोटोवर नेटकरही फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:29 PM2022-05-13T18:29:48+5:302022-05-13T18:57:55+5:30

टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari) तिच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल, कोणत्याही प्रकारच्या ड्रेसमध्ये ती सुंदरच दिसते. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारी फ्लोरल ड्रेसमध्ये तिची ग्लॅमरस फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होतायेत.श्वेता तिवारीचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर ३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

ब्लॅक कलरच्या ट्रासपरंट ओपन गाऊनमध्ये श्वेता तिवारी खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. श्वेता तिवारीच्या या फोटोशूटला काही तासांतच जवळपास 2 लाख लाइक्स आले आहेत. ((फोटो इन्स्टाग्राम)

2001 मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने श्वेताला खरी ओळख दिली. या मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका साकारली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

2004 मध्ये बॉलिवूडमध्येही तिने पदार्पण केले. त्यावर्षी बिपाशा बासू स्टारर ‘मदहोशी’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा यानंतर आबरा का डाबरा, मिले ना मिले हम या चित्रपटांतही ती झळकली. याशिवाय अनेक भोजपुरी सिनेमांतही तिने काम केले.(फोटो इन्स्टाग्राम)

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केले होते. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी लग्न केले मात्र तिचे हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकू शकले नाही.(फोटो इन्स्टाग्राम)