IN PICS : कधीकाळी 900 रूपयांची नोकरी करायची साक्षी तंवर, आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 08:00 AM2021-01-12T08:00:00+5:302021-01-12T08:00:01+5:30

हिच्या मनमोहक हास्यावर सारे फिदा... आज साक्षीचा वाढदिवस.

कहानी घर घर की, बड़े अच्छे लगते हैं यासारख्या मालिकेतून अभिनेत्री साक्षी तंवर घराघरांत पोहचली. अगदी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य असावी, तसे चाहते तिच्यावर प्रेम करतात. आजही टीव्हीची पार्वती याच नावाने साक्षी ओळखली जाते.

आज साक्षीचा वाढदिवस. साक्षीने कधीच वयाची चाळीशी ओलांडली. पण आजही ती अविवाहित आहे. मात्र ती एका मुलीची आहे. या मुलीला साक्षीने दत्तक घेतले आहे. साक्षीच्या मुलीचे नाव दित्या आहे.

12 जानेवारी 1973 रोजी राजस्थानच्या अलवर येथे साक्षीचा जन्म झाला.

कॉलेज पूर्ण झाल्यावर साक्षीने दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून काम केले.

खजाना नावाच्या एका ज्वेलरी शॉपमध्येही तिने काम केले. येथे महिन्याकाठी तिला 900 रूपये पगार मिळायचा. आज हीच साक्षी एका एपिसोडचे लाखो रूपये घेते.

पहिल्या पगारात साक्षीने पिवळ्या आणि हिरव्या रंगाची साडी खरेदी केली होती.

यानंतर साक्षीला अलबेला सू मेला या दूरदर्शनच्या शोमध्ये अँकरिंग करण्याची संधी मिळाली. यादरम्यान साक्षीला अभिनय खूणावू लागला आणि ती मालिकांमध्ये आली.

साक्षी जिथे जाईल, तिथे लग्नाबद्दल तिला विचारले जाते. पण साक्षीचे यावर ठाम मत आहे. योग्य व्यक्ति मिळेल तेव्हाच मी लग्न करणार, असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

मला अद्याप असे कुणी नाही मिळाले, ज्याच्याशी मी लग्न करू शकेन. माझा विवाह संस्थेवर पूर्ण विश्वास असला तरीही योग्य व्यक्ती जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नसल्याचे तिने म्हटले होते .

साक्षी एक बिनधास्त आणि परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत राम कपूर आणि साक्षीवर अनेक लव्ह मेकिंग सीन्स चित्रीत करण्यात आले होते.

रामसोबतच्या साक्षीच्या या इंटिमेट सीन्सची दीर्घकाळ चर्चा रंगली होती. राम आणि साक्षीवर चित्रीत करण्यात आलेला हा इंटिमेट सीन हा तब्बल 17 मिनिटांचा होता. हा सीन मालिकेत दाखवल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप देखील नोंदवला होता.