सई लोकुरने ब्लॅक साडीमधल्या PHOTO नी नेटकऱ्यांना केलं घायाळ; फोटोंनी वेधले लक्ष

Published: May 7, 2021 09:03 PM2021-05-07T21:03:24+5:302021-05-07T21:12:45+5:30

'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमुळे सई लोकुरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.याच शोमुळे ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या सिनेमात कपिल शर्मासह ती झळकली होते.सईने या सिनेमात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

गेल्याच वर्षी सई लोकूरने ३० नोव्हेंबर रोजी तिर्थदीप रॉयसह विवाह बंधनात अडकली होती.

पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला, तिच्या लग्नाचीही चर्चा फार रंगली होती.

सई लोकुर सध्या तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.

सोशल मीडियावरही सई लोकुर प्रचंड सक्रीय असते.

विविध अंदाजातील फोटो चाहत्यांसह शेअर करत असते.

फॅशन आणि स्टाईलबाबत सई लोकुर तितकीच सजग आहे.

ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.

हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सई लोकुर सोशल मीडियावर शेअर करत असते.

या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतायेत.

यांत तिने काळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे. यामध्ये सईचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!