'उंच माझा झोका' मालिकेतली छोटी रमा आठवतेय ? आता तिला ओळखणेही कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:10 PM2021-10-14T16:10:57+5:302021-10-14T16:46:13+5:30

‘उंच माझा झोका’ या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. तर बालकलाकार तेजश्री वालावलकर छोट्या रमाबाईंच्या तर विक्रम गायकवाड न्यायमूर्ती रानडे यांच्या व्यक्तिरेखेत झळकले होते.

याच मालिकेमुळे तेजश्रीला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली.

मात्र आता हीच तेजश्री करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही.

आज तिचा बदललेला लूक पाहून आपण पहातच राहाल.

दिलेल्या एका मुलाखतीत रमा भूमिका कशी मिळाली याविषयी तेजश्रीने सांगितले होते की, या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू असल्याचे कळल्यावर मला आई घेऊन गेली.

तिथे माझी स्क्रीन टेस्ट झाली. ऑडिशन झाली. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी माझी निवड केली.

माझ्या पणजी आजीचे नावही रमाबाई होते आणि माझे पणजोबा सेवासदनमध्ये मुख्याध्यापक होते, हा एक योगायोग आहे.

ही भूमिका करताना मला जुन्या काळातील खूप गोष्टी, सवयी शिकाव्या लागल्या. मुख्य म्हणजे भाषा.नंतर ती भाषाही सवयीची झाली होती.

लहानपणापासून तेजश्री कलेशी जोडली गेली आहे. तेजश्रीला लिखाणाची आवड आहे. तिने दोन बालनाट्येसुद्धा लिहिली आहेत.

भालबा केळकर प्रतिष्ठानतर्फे तिने सादरही केली होती. ‘हो, मला जमेल’ आणि ‘दहीहंडी’ ही ती दोन नाटके. ती दिग्दर्शित केली आणि त्यात अभिनयही केला होता.

अस्मिता चित्रच्या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्यासह काम केले आहे.