नाईकांच्या वाड्यावर परत कधी? चाहत्याच्या प्रश्नावर ‘रात्रीस खेळ चाले’च्या सुसल्याचं उत्तर

Published: June 18, 2021 05:20 PM2021-06-18T17:20:33+5:302021-06-18T17:27:57+5:30

Ratris Khel Chale : ‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या पर्वात भेटलेली सुसल्या अर्थात ऋतुजा धर्माधिकारी भाव खाऊन गेली होती.

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका तुफान चालली. तितकीच या मालिकेतील पात्रंही गाजलीत. यातलेच एक पात्र म्हणजे, सुसल्या अर्थात सुषमा.

‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हिनं ही भूमिका साकारली होती.

‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या पर्वात भेटलेली सुसल्या अर्थात ऋतुजा धर्माधिकारी भाव खाऊन गेली होती.

सुसल्याच्या भूमिकेत तिने अक्षरश: जीव ओतला होता. याच मालिकेच्या जोरावर ऋतुजाला बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात संधी मिळाली.

पण त्यानंतर ऋतुजा टीव्ही विश्वातून जणू गायब आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ तिसरा सीझन सध्या सुरू आहे. या सीझनमध्ये ऋतुजा पुन्हा दिसणार, अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

आता खुद्द ऋतुजानेच सोशल मीडियावर या चर्चांवर उत्तर दिलं आहे. ‘नाईकांच्या वाड्यावर परत कधी?’ असा प्रश्न एका चाहत्याने तिला केला. यावर बहुतेक नाही, असे उत्तरं तिनं दिलं.

ऋतुजा टीव्हीवरून तूर्तास गायब असली तरी सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

सोशल मीडियावरचे तिचे बोल्ड व ग्लॅमरस फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ऋतुजाच्या या बोल्ड फोटोंची चांगलीच चर्चा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!