'आभाळमाया'च्या सुधामध्ये झालाय कमालीचा बदल; आजही करते मालिकांमध्येच काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:30 AM2021-10-19T11:30:00+5:302021-10-19T11:30:00+5:30

Sukanya kulkarni-mone: आजही आभाळमाया आणि त्यातील कलाकारांवर प्रेम करणारे असंख्य प्रेक्षक आहेत. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता यत्किंचितही कमी न झाल्याचं दिसून येतं.

मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासातील मानचं पान ठरलेली मालिका म्हणजे 'आभाळमाया'. चौकोनी कुटुंबावर आधारित असलेली ही मालिका त्याकाळी तुफान गाजली.

आजही आभाळमाया आणि त्यातील कलाकारांवर प्रेम करणारे असंख्य प्रेक्षक आहेत. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता यत्किंचितही कमी न झाल्याचं दिसून येतं.

साधी सरळ कथा, उत्तम संवाद, कलाकारांचं अभिनय कौशल यामुळे लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील सुधा हे पात्र विशेष गाजलं.

ही भूमिका अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने यांनी साकारली होती. विशेष म्हणजे आजही प्रेक्षक त्यांच्यावर भरभरुन प्रेम करतात.

आभाळमायाच्या अभुतपूर्व यशानंतर सुकन्या मोने यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुकन्या यांच्याकडे पाहिलं जातं. गेले अनेक वर्ष त्या कलाविश्वात सक्रीय असून अनेक मालिका, नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

सुकन्या मोने यांच्यात आता कमालीचा बदल झालेला आहे. मात्र, त्यांच्या अभिनयातील गोडवा आजही कायम आहे.

सुकन्या मोने अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगनादेखील आहेत.

कॉलेज जीवनात सुकन्या मोने मोठ्या हरहुन्नरी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत होत्या हे या फोटोवरुन लक्षात येतं.

सुकन्या मोने यांना फिरण्याची आवड असून अनेकदा त्या नवनवीन ठिकाणांना भेट देत असतात.

सुकन्या मोने यांच्यात कमालीचा बदल झाला आहे.

सुकन्या मोने आणि संजय मोने यांचा एक सुंदर फोटो